Viral : मोहनीश बहलची लेक प्रनूतनचा बोल्ड अवतार; पाहून व्हाल खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 10:37 AM2019-12-01T10:37:00+5:302019-12-01T10:38:03+5:30

डेब्यू सिनेमाची चर्चा होवो ना होवो. प्रनूतन मात्र सध्या जाम चर्चेत आहे.

mohnish bahl daughter pranutan bahl bold photos in saree going viral | Viral : मोहनीश बहलची लेक प्रनूतनचा बोल्ड अवतार; पाहून व्हाल खल्लास

Viral : मोहनीश बहलची लेक प्रनूतनचा बोल्ड अवतार; पाहून व्हाल खल्लास

googlenewsNext
ठळक मुद्देसलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसने प्रनूतनला लॉन्च केले होते. तिच्या पहिल्या सिनेमाचे नाव ‘नोटबुक’ होते.

सध्या बॉलिवूडमध्ये  स्टारकिड्सची चलती आहे. अनेकांचा बॉलिवूड डेब्यू झालाय आणि अनेक जण डेब्यूसाठी सज्ज आहे. यापैकीच एक म्हणजे, बॉलिवूड अभिनेता मोहनीश बहल याची लेक प्रनूतन बहल. प्रनूतनचा डेब्यू तर झाला. पण तिच्या पहिल्या चित्रपटाला म्हणावे तसे यश लाभले नाही. पण डेब्यू सिनेमाची चर्चा होवो ना होवो. प्रनूतन मात्र सध्या जाम चर्चेत आहे. शेवटी नूतन यांच्या नातीच्या चर्चा तर होणारच. अलीकडे प्रनूतन फिल्ममेकर सूरज बडजात्या यांचा मुलगा देवांश याच्या लग्नात पोहोचली. या लग्नातील प्रनूतनचा ग्लॅमरस लूक सर्वाधिक लक्षवेधी ठरला. 


सीग्रीन साडी आणि ब्लॅकलेस ब्लाऊज असा तिचा बोल्ड अंदाज सगळ्यांनाच घायाळ करून गेला. यादरम्यानचे फोटो प्रनूतनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रनूतन सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर ती स्वत:चे रोज नवे फोटो शेअर करत असते. 

प्रनूतन हिची एक वेगळी ओळख म्हणजे, ती दिवंगत अभिनेत्री नूतन यांची नात आहे.  साहजिकच प्रनूतनकडून आत्तापासून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा असणार आहे. याचे एक कारण म्हणजे, तिला आवडो, ना आवडो तिची आजी नूतनसोबत तुलना होणार आहे. 

नूतन या आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. प्रनूतनच्या नावातच नूतन असल्याने साहजिकच तिच्याकडून लोकांच्या भरपूर अपेक्षा राहणार आहेत. याशिवाय सध्याची लोकप्रीय अभिनेत्री काजोलसोबतही अप्रत्यक्षपणे तिची तुलना होणार आहे.


 आपण सगळेच जाणतो की, काजोलची आई तनुजा आणि नूतन दोघी बहीणी आहेत. या नात्याने काजोल आणि मोहनीश बहल मावस भाऊ-बहीण आहेत आणि याच नात्याने प्रनूतन  काजोलची भाची आहे. 


२५ वर्षांच्या प्रनूतनने मुंबई विद्यापीठातून बीएलएस एलएलबीची पदवी घेतली आहे. तिला नृत्याचीही आवड आहे. सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसने प्रनूतनला लॉन्च केले होते. तिच्या पहिल्या सिनेमाचे नाव ‘नोटबुक’ होते.

Web Title: mohnish bahl daughter pranutan bahl bold photos in saree going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.