‘मोहेंजोदडो’ १२ आॅगस्टला रिलीज होणार !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 22:34 IST2016-08-08T17:04:06+5:302016-08-08T22:34:06+5:30
हृतिक रोशन अभिनीत ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कथित लेखक आकाशदित्य ...

‘मोहेंजोदडो’ १२ आॅगस्टला रिलीज होणार !!
ह तिक रोशन अभिनीत ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कथित लेखक आकाशदित्य लामा यांनी कॉपीराईटचा मुद्दा उपस्थित करत ‘मोहेंजोदडो’च्या प्रदर्शनास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली होती. प्रारंभी मुंबई उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने याप्रकरणी लामा यांना चुकीच्या व विलंबाने केलेल्या याचिकेबद्दल १ लाख रूपयांचा दंड ठोठावला होता. या निर्णयास लामा यांनी आव्हान दिले होते. तसेच प्रकरण निकाली निघेपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्याची विनंती केली होती. ती विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे ‘मोहेंजोदडो’ ठरल्या तारखेनुसार म्हणजेच १२ आॅगस्टला रिलीज होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे..