करीनाच्या आधी सैफ अली खानच्या आयुष्यात होती ही मॉडेल, तिच्यासाठी दिला होता पत्नी अमृता सिंगला घटस्फोट

By तेजल गावडे | Updated: October 6, 2020 13:17 IST2020-10-06T13:16:30+5:302020-10-06T13:17:15+5:30

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोट करीना कपूरमुळे झाला नव्हता. तर त्यासाठी इटालियन मॉडेल होती कारणीभूत

The model was in Saif Ali Khan's life before Kareena, who was divorced from his wife Amrita Singh | करीनाच्या आधी सैफ अली खानच्या आयुष्यात होती ही मॉडेल, तिच्यासाठी दिला होता पत्नी अमृता सिंगला घटस्फोट

करीनाच्या आधी सैफ अली खानच्या आयुष्यात होती ही मॉडेल, तिच्यासाठी दिला होता पत्नी अमृता सिंगला घटस्फोट

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या प्रेग्नेंट पत्नी करीना कपूर आणि मुलगा तैमूरसोबत पटौडी पॅलेसमध्ये वेळ व्यतित करत आहेत. सैफ चौथ्यांदा वडील बनणार आहे. या दरम्यान सैफची मुलगी सारा अली खान ड्रग्स प्रकरणात नाव समोर आले होते. तिची एनसीबीने या प्रकरणी चौकशीदेखील केली. इतकेच नाही तर असेदेखील वृत्त आले की अडचणीत सापडलेल्या आपली मुलगी साराला मदत करण्यासाठी सैफने नकार दिला. सैफने सारा ड्रग्स प्रकरणात अडकली याचा दोष पहिली पत्नी अमृता सिंगला दिला. कारण सैफ-अमृताच्या घटस्फोटानंतर सारा आणि इब्राहिमची जबाबदारी अमृताकडे सोपविण्यात आली. त्यामुळे सैफने फोन करून अमृताला खडेबोल सुनावले होते.

अमृता सिंगचे सैफ अली खानसोबत सुरू असलेल्या भांडणाचे वृत्त मीडियामध्ये आल्यानंतर सैफला ट्रोलिंगचा खूप सामना करावा लागला होता.या मागचं कारण आहे सैफची पर्सनल लाइफ. जे खूप वादग्रस्त राहिले आहे. सैफ आणि अमृता विभक्त होण्यामागे एका इटालियन मॉडेल कारणीभूत आहे.

सैफने इटालियन मॉडेल रोजा कॅटलानोसाठी पत्नी अमृताला फसविले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता आणि सैफचे लग्न तुटण्यामागे सर्वात मोठे कारण रोजासोबत सैफचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जबाबदार असल्याचे बोलले जात होते.


२००४ साली सैफ आणि रोजाची भेट केन्यामध्ये झाली होती. सैफचे विवाहित जीवन त्यावेळी खूप नाजूक परिस्थितीतून जात होते. त्यावेळी सैफ आणि अमृतामध्ये खूप भांडणे होत होती. रोजाला भेटल्यानंतर सैफला तिच्यावर प्रेम झाले होते.


सैफ आणि रोजाच्या अफेअरचे वृत्त अमृतापासून जास्त काळ लपल्या नाहीत. सैफ फसवत असल्याचे समजल्यावर अमृता त्याच्यासोबत राहणे मंजूर नव्हते. तर सैफला रोजामुळे अमृतापासून वेगळे व्हायचे होते. २००४ साली दोघे विभक्त झाले. त्यानंतर रोजा सैफसाठी मुंबईत आली. सैफने रोजाला देखील फसविले होते. जे तिला मुंबईला आल्यावर समजले. एका मुलाखतीत रोजाने सांगितले होते की सैफने तिच्यापासून पहिले लग्न आणि मुलांबद्दल सांगितले नव्हते. रोजाला सैफचे लग्न, मुले आणि घटस्फोटाबद्दल भारतात आल्यानंतर समजले होते. दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले होते. त्यावेळी सारा १० वर्षांची होती आणि इब्राहिम ४ वर्षांचा होता.

अमृता आणि सैफचे लग्न तुटल्याचा गंभीर परिणाम सारा व इब्राहिमवर पडला होता. ४ वर्षांचा इब्राहिम सैफला विचारायचा की तुम्ही घरी का येत नाही? त्यावेळी सैफकडे इब्राहिमच्या या प्रश्नाचे उत्तर नव्हते. एका मुलाखतीत सैफने मुलांपासून लांब राहण्याचे दुःख व्यक्त केले होते. तो म्हणाला होता की, माझ्या वॉलेटमध्ये माझा मुलगा इब्राहिमचा फोटो आहे. त्याचा फोटो पाहिला की मला रडू कोसळते. मला साराचीदेखील आठवण येते. त्यांना भेटण्याची परवानगी मला नाही. त्यांना माझ्याकडे येण्याची परवानगी नाही कारण माझ्या आयुष्यात कुणी नवीन स्त्री होती.


२००४ साली अमृताला घटस्फोट दिल्यानंतर सैफने २०१२ साली करीना कपूरसोबत लग्न केल होते. 

Web Title: The model was in Saif Ali Khan's life before Kareena, who was divorced from his wife Amrita Singh