महानायक जरा मोठेपणा दाखवा...! अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोर ‘मनसे’चं बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 10:24 AM2021-07-15T10:24:48+5:302021-07-15T10:27:36+5:30

Big b show Big heart...!! मनसेला बिग बींच्या उत्तराची 'प्रतिक्षा'

MNS puts up a poster outside Amitabh Bachchan's bungalow to help with road widening |  महानायक जरा मोठेपणा दाखवा...! अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोर ‘मनसे’चं बॅनर

 महानायक जरा मोठेपणा दाखवा...! अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोर ‘मनसे’चं बॅनर

googlenewsNext
ठळक मुद्दे2017 मध्ये पालिकेने अमिताभ यांना यासंदर्भात नोटीस पाठवली होती. मात्र बिग बींनी अद्याप  उत्तर दिलेलं नाही.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतात. सध्या चर्चा आहे ती त्यांच्या घराबाहेर टांगलेल्या बॅनरची. होय, बिग बींच्या  जूहू येथील ‘प्रतिक्षा’ बंगल्यासमोरचं बॅनर तूर्तास सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) (MNS ) हे बॅनर लावण्यात आलं आहे.  महानायक आहात, जरा मनाचा मोठेपणा दाखवा, अशा आशयाच्या या बॅनरची सध्या भारी चर्चा आहे. (MNS puts up a poster outside Amitabh Bachchan's bungalow)
आता हे बॉनर झळकण्यामागचं कारण काय तर रस्त्याचं रूंदीकरण. होय, अमिताभ यांचा ‘प्रतीक्षा’ हा बंगला संत ज्ञानेश्वर मार्गावर आहे आणि मुंबई महानगर पालिका या मार्गाचे रूंदीकरण करू इच्छिते. पण यात एक अडचण आहे. मार्गाच्या रूंदीकरणासाठी अमिताभ यांच्या बंगल्याची एक भींत तोडावी लागणार आहे.

अमिताभ यांच्या घरासमोर रोज जाम लागतो. त्यामुळे हा मार्ग 60 फूट रूंद करण्याचा पालिकेचा इरादा आहे. यापूर्वी 2017 मध्ये पालिकेने अमिताभ यांना यासंदर्भात नोटीस पाठवली होती. मात्र बिग बींनी अद्याप  उत्तर दिलेलं नाही.

अमिताभ यांनी बीएमसीकडून नोटीस मिळाल्यानंतर न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं यावर आपला निर्णय देत हे काम थांबवण्यास सांगितलं होतं. मात्र, मागील वर्षी न्यायालयानं काम पुन्हा एकदा सुरू करण्याचं म्हटलं होतं.   कॉलेज, शाळा, हॉस्पिटल असलेल्या या मार्गावर अमिताभ यांच्या ‘प्रतिक्षा’ बंगल्यामुळे अडचण होत आहे. त्यामुळे आम्हाला अमिताभ बच्चन यांच्या मोठेपणाची प्रतिक्षा आहे, अशा आशयाचं बॅनर मनसेकडून लावण्यात आलं आहे.
 

Web Title: MNS puts up a poster outside Amitabh Bachchan's bungalow to help with road widening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.