मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:19 IST2025-10-30T10:18:01+5:302025-10-30T10:19:19+5:30
'अनुपमा' या गाजलेल्या मालिकेत ती खलनायिकेच्या भूमिकेत होती. मदालसाने साऊथमध्येही काम केलं आहे. काही साऊथ सिनेमांमध्ये ती दिसली होती. मात्र साऊथमध्ये तिला वाईट अनुभव आला. त्यामुळेच तिने साऊथ सोडून हिंदी इंडस्ट्रीकडे वळण्याचा निर्णय घेतला.

मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
मिथुन चक्रवतींची सून मदालसा शर्मादेखील मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे. मदालसाने अनेक हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'अनुपमा' या गाजलेल्या मालिकेत ती खलनायिकेच्या भूमिकेत होती. मदालसाने साऊथमध्येही काम केलं आहे. काही साऊथ सिनेमांमध्ये ती दिसली होती. मात्र साऊथमध्ये तिला वाईट अनुभव आला. त्यामुळेच तिने साऊथ सोडून हिंदी इंडस्ट्रीकडे वळण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मदालसाने याबाबत सांगितलं.
साऊथ इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचसारखा प्रकार घडल्याचा धक्कादायक खुलासा मदालसाने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत केला. या वाईट अनुभवामुळेच मदालसाने साऊथ इंडस्ट्री सोडली. ती म्हणाली, "मला तिथे खूप वाईट अनुभव आलेत. ज्याचा मी विचारही करू शकत नाही. कास्टिंग काऊच आणि बाकीच्या गोष्टी सगळीकडेच आहेत. पण साऊथमध्ये माझी निराशा झाली. असा कोणता अनुभव आला नाही. पण, एका चर्चेदरम्यान मी प्रचंड अस्वस्थ झाले. तेव्हा मी केवळ १७ वर्षांची असेन. आता त्याला बरीच वर्ष झाली आहेत. पण, मला अजूनही चांगलं आठवतंय की त्या मीटिंगमध्ये मला अस्वस्थ वाटू लागलं आणि मी तिथून बाहेर पडले. आणि तेव्हाच ठरवलं मुंबईत परत यायचं".
"प्रत्येकाने एक लक्ष्य ठरवलेलं असतं आणि तिथे पोहोचण्यासाठी आपण काही ना काही करत असतो. माझं लक्ष्य हे महत्वाकांक्षा आहे. पण ते इतकंही मोठं नाही की त्यामुळे मी सगळं विसरेन. कोणती गोष्ट मला हवी आहे, कोणती नको आणि काय किंमत मोजून मला ती मिळवायची आहे, मी या सगळ्याचा विचार करूनच निर्णय घेते", असंही मदालसाने सांगितलं.