‘मिर्झिया’ ची फ्रेम बदलली नाही - सैय्यामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 19:06 IST2016-12-03T19:06:03+5:302016-12-03T19:06:03+5:30

सैय्यामी खेर आणि हर्षवर्धन कपूर यांनी ‘मिर्झिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्या दोघांचा अभिनय उत्तम असला तरीही प्रेक्षकांवर चित्रपटाचा ...

Mirza's frame did not change - Saami | ‘मिर्झिया’ ची फ्रेम बदलली नाही - सैय्यामी

‘मिर्झिया’ ची फ्रेम बदलली नाही - सैय्यामी

य्यामी खेर आणि हर्षवर्धन कपूर यांनी ‘मिर्झिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्या दोघांचा अभिनय उत्तम असला तरीही प्रेक्षकांवर चित्रपटाचा प्रभाव फार काही पडू शकला नाही, हे देखील तेवढेच खरे. मात्र सैय्यामीला चित्रपटामुळे खुप काही शिकायला मिळालं असे ती सांगते. 



सैय्यामी तिचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर करताना म्हणते,‘ आम्ही जेव्हा चित्रपटाची शूटिंग करत होतो तेव्हा बॉक्स आॅफिसवरील आकड्यांकडे आमचे मुळीच लक्ष नव्हते. आमचे काम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पूर्ण करणे एवढाच आमचा उद्देश होता. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या चित्रपटाला गुलजार साहेबांचे शब्द लाभले असून त्यांनी माझे आयुष्यच बदलून टाकले आहे. मी त्यांच्याकडून बरंच काही शिकले आहे. हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या एकदम परफेक्ट आहे. त्याची फ्रेम बदलण्याचा मी प्रयत्नही केला नाही. तुम्ही एखाद्या चित्रपटात भूमिका साकारून तो पूर्ण केला असेल तर त्याचे यश हे त्याच्या चाहत्यांवर सोडून द्यायला हवे.’ 



सेटवरील घडामोडी सांगताना सैय्यामी म्हणाली,‘ मिर्झिया चित्रपटाच्या सेटवर एक नियम होता. तो म्हणजे कामाच्या वेळी काम आणि फन टाईमिंगवेळी फक्त धम्माल. त्यामुळे आमचे काम झाले की, आम्ही चित्रपटाची टीम आऊटिंगसाठी जायचो. शूटिंगदरम्यान आम्ही एवढी धम्माल केलीये की, चित्रपटाच्या रिलीजनंतर आम्ही आमच्या जुन्या आठवणींमध्ये रममाण झालो.’ 

Web Title: Mirza's frame did not change - Saami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.