ये भी ठीक है! 'मिर्झापूर २'चा 'रॉबिन' करतोय लग्न, 'या' अभिनेत्रीसोबत आहे रिलेशनशिपमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 14:01 IST2020-11-25T13:46:08+5:302020-11-25T14:01:00+5:30
हे लग्न प्रियांशुचं होमटाउन देहरादून येथे होणार आहे. असेही मानले जात आहे की, लग्नाचं रिसेप्शन मुंबईमध्ये डिसेंबरमध्ये होऊ शकतं.

ये भी ठीक है! 'मिर्झापूर २'चा 'रॉबिन' करतोय लग्न, 'या' अभिनेत्रीसोबत आहे रिलेशनशिपमध्ये!
सर्वात पॉप्युलर इंडियन वेबसीरीजपैकी असलेल्या 'मिर्झापूर'च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसलेला अभिनेता प्रियांशु पॅनयुली त्याची अनेक वर्षांपासूनची गर्लफ्रेन्ड आणि डान्सर-अभिनेत्री वंदना जोशीसोबत लग्न करण्याच्या तयारीत आहे. अनेक महिन्यांपासून त्यांच्या लग्नाचं प्लॅनिंग पुढे जात होतं. आता दोघे २६ नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. हे लग्न प्रियांशुचं होमटाउन देहरादून येथे होणार आहे. असेही मानले जात आहे की, लग्नाचं रिसेप्शन मुंबईमध्ये डिसेंबरमध्ये होऊ शकतं.
हिंदुस्थान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, प्रियांशु म्हणाला की तो या वर्षाच्या सुरूवातीलाच लग्न करणार होता. पण कोरोनामुळे ते शक्य होऊ शकलं नाही आणि प्लॅन पुढे गेला. प्रियांशुच्या या लग्नात केवळ ५० लोकच सहभागी होतील. आज बुधवारी २५ नोव्हेंबरला संगीत सेरमनीचा कार्यक्रम होणार आहे.
प्रियांशुने सांगितले की, तो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला परत येईल. इथे तो फिल्म इंडस्ट्रीतील जवळच्या मित्रांना रिसेप्शनमध्ये बोलवेल. प्रियांशु पहिल्यांदा वंदनाला मुंबईत २०१३ मध्ये थिएटर करताना भेटला होता. तेव्हा दोघेही वैभवी मर्चंटच्या म्युझिकल 'प्ले ताज एक्सप्रेस'मध्ये काम करत होते. या प्लेमध्ये प्रियांशु आणि वंदना मुख्य भूमिकेत होते.
दरम्यान, मिर्झापूरनंतर आता प्रियांशु पुढील सिनेमा 'रश्मि रॉकेट'मध्ये तापसी पन्नूसोबत दिसणार आहे. त्यासोबतच प्रियांशु काही वेबसीरीजमध्येही काम करणार आहे. अर्थातच आता मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची घोषणा झाली आहे. त्यामुळे त्यातही तो दिसेल हे फिक्स झालं आहे.