पतीची एक्स गर्लफ्रेंड विद्या बालनवर कॉमेण्ट करणाऱ्या मीरा राजपूतला युजर्सनी सुनावले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 16:32 IST2017-12-28T10:56:56+5:302017-12-28T16:32:27+5:30

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत अभिनेत्री नेहा धूपिया हिच्या नोफिल्टर चॅट शोमध्ये पोहोचली असता नेहाने मीराला विचारले की, ...

Mira Rajput, who commits husband's girlfriend to Vidya Balan, has been told by the users !! | पतीची एक्स गर्लफ्रेंड विद्या बालनवर कॉमेण्ट करणाऱ्या मीरा राजपूतला युजर्सनी सुनावले!!

पतीची एक्स गर्लफ्रेंड विद्या बालनवर कॉमेण्ट करणाऱ्या मीरा राजपूतला युजर्सनी सुनावले!!

िनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत अभिनेत्री नेहा धूपिया हिच्या नोफिल्टर चॅट शोमध्ये पोहोचली असता नेहाने मीराला विचारले की, इंडस्ट्रीमधील अशी कोणती अभिनेत्री आहे, जिला तिच्या स्टायलिस्टला बदलण्याची गरज आहे? यावर मीराने क्षणाचाही विलंब न करता, अभिनेत्री विद्या बालनचे नाव घेतले. मात्र मीराचे हे उत्तर काही लोकांना भावले नसल्याने ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. या शोमध्ये मीराने विद्या बालनचे नाव घेतल्याने ट्विटरवर तिच्यावर खरपूस टीका केली जात आहे. एका यूजर्सने म्हटले की, ‘विद्या तुझ्या नवºयाची एक्स गर्लफ्रेंड असल्यामुळे तू तिच्यावर जळत आहेस काय?’

२००८ मध्ये आलेल्या ‘किस्मत कनेक्शन’ या चित्रपटादरम्यान शाहिद आणि विद्याच्या लिंकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळेच विद्याचे चाहते मीरावर टीका करीत आहेत. दरम्यान, मीरा राजपूत आणि शाहिद कपूर जुहूमधील ज्या बिल्डिंगमध्ये राहतात, त्याच बिल्डिंगमध्ये विद्या बालन पती सिद्धार्थ रॉय-कपूरसोबत राहते. अशात मीराने विद्यावर केलेली अप्रत्यक्ष टीका त्यांच्यात आणखी वैर निर्माण करणारी असल्याचे दोघींच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.



दरम्यान, काही दिवसांपूर्वी शाहिद कपूरदेखील एका पेपर कटिंगवरून ट्रोल झाला होता. शाहिदची बातमी असलेले एक पेपर कटिंग अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहिदकडून एक स्टेटमेंट लिहिलेले दिसत आहे. या स्टेटमेंटमध्ये शाहिदने लिहिले की, ‘माझ्या आयुष्यात सर्वाधिक मजेशीर किस्सा तो होता, जेव्हा मला वयाच्या १८व्या वर्षी ही कल्पना नव्हती की, मी ज्या मुलीशी लग्न करणार त्या मुलीचे त्यावेळचे वय पाच वर्षे इतके असेल, तर मी १८ वर्षांचा असेल. ’ शाहिदच्या याच स्टेटमेंटवरून चाहत्यांकडून त्याच्यावर टीका केली गेली. 

Web Title: Mira Rajput, who commits husband's girlfriend to Vidya Balan, has been told by the users !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.