मिलिंद सोमणने शेअर केला होता न्यूड फोटो, या फोटोमुळे माजली होती खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:46 IST2021-02-11T12:44:57+5:302021-02-11T12:46:11+5:30

मिलिंद सोमणने त्याच्या ५५व्या वाढदिवशी त्याचा न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

Milind Soman shared picture of him running in the nude on birthday | मिलिंद सोमणने शेअर केला होता न्यूड फोटो, या फोटोमुळे माजली होती खळबळ

मिलिंद सोमणने शेअर केला होता न्यूड फोटो, या फोटोमुळे माजली होती खळबळ

ठळक मुद्देमिलिंद विवस्त्रावस्थेत धावतानाचा हा फोटो त्याची पत्नी अंकिता कुवरने शूट केला होता. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती.

मिलिंद सोमण भारताच्या सुपरमॉडेल्सपैकी एक आहे. मिलिंदने स्वत:पेक्षा २६ वर्षांनी लहान अंकिता कंवरसोबत लग्न केले, तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. २०१८ मध्ये अंकिता आणि मिलिंद यांनी लग्न केले होते. त्यावेळी मिलिंद ५२ वर्षांचा तर अंकिता २६ वर्षांची होती. सध्या तो ‘पौरषपूर’ या वेबसीरिजमध्ये एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना दिसत आहे. तो गेल्या काही महिन्यांपूर्वी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला होता.

मिलिंद सोमणने त्याच्या ५५व्या वाढदिवशी त्याचा न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. तो विवस्त्रावस्थेत धावतानाचा हा फोटो त्याची पत्नी अंकिता कुवरने शूट केला होता. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. अनेक राजकीय पक्षांनी या फोटोवर आक्षेप नोंदवला होता. या फोटोची प्रसारमाध्यमात चर्चा रंगल्यानंतर या फोटोवर मिलिंदने त्याची प्रतिक्रिया दिली होती. 

‘पिपिंगमून’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत मिलिंदने या फोटोवर त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. नग्न म्हणजे काय? असा सवाल त्याने यावेळी विचारला होता. त्याने या मुलाखतीत सांगितले होते की, ‘गेल्या कित्येक वर्षांपासून मी न्यूड फोटोशूट करतोय. याआधीही अनेकदा मी न्यूड फोटोशूट केले आहे. मी पहिल्यांदा न्यूड फोटोशूट केले, तेव्हाही चर्चेत होतो. आता गोव्यातील त्या फोटोवरूनही चर्चा सुरू आहे. फरक इतकाच की, प्रत्येकवेळी लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या. नग्न व्यक्ती म्हणजे काय? माझ्या मते, देवाने आपल्याला जसे बनवले तेच. इंटरनेटवर नग्न लोकांचे चिक्कार फोटो आहेत. इन्स्टाग्रामवरही अनेक न्यूड फोटो पोस्ट होत असतात. मी फक्त इतकेच म्हणेल की, प्रत्येकाचे विचार आणि स्वप्नं वेगवेगळी असतात.

मिलिंद सोमणच्या या न्यूड फोटोवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिलिंदने काही वर्षांपूर्वी देखील एका जाहिरातीसाठी न्यूड फोटोशूट केले होते. 

Web Title: Milind Soman shared picture of him running in the nude on birthday