​मिलिंद सोमणने केला साखरपुडा! गर्लफ्रेन्डच्या बोटात दिसली अंगठी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 10:56 IST2018-04-09T05:26:43+5:302018-04-09T10:56:43+5:30

अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याच्यापेक्षा त्याची अर्ध्या वयाची गर्लफ्रेन्ड अंकिता कोनवार या दोघांनी साखरपुडा केल्याचे मानले जात आहे. होय, ...

Milind Soman has made a mistake! The ring in the finger of the girlfriends !! | ​मिलिंद सोमणने केला साखरपुडा! गर्लफ्रेन्डच्या बोटात दिसली अंगठी!!

​मिलिंद सोमणने केला साखरपुडा! गर्लफ्रेन्डच्या बोटात दिसली अंगठी!!

िनेता मिलिंद सोमण आणि त्याच्यापेक्षा त्याची अर्ध्या वयाची गर्लफ्रेन्ड अंकिता कोनवार या दोघांनी साखरपुडा केल्याचे मानले जात आहे. होय, मिलिंद व अंकिता यांच्यात वयाचा बरेच अंतर आहे. पण वयाचा हे अंतर त्यांच्या नात्यात कुठेच आड आला नाही आणि आता कदाचित दोघांनीही आपल्या नात्याला अधिकृत नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यात तिने मिलिंदचा हात पकडला आहे आणि तिच्या बोटात एन्गेज्डमेंट रिंग स्पष्ट दिसतेय. हा फोटो पाहून मिलिंद व अंकिताने साखरपुडा केल्याचा अंदाज बांधला जात आहे. अर्थात आत्तापर्यंत मिलिंद व अंकिता या दोघांपैकी कुणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद काही महिन्यांपूर्वी अंकिताच्या गुवाहाटी येथील घरी गेला होता. अंकिताच्या भाच्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तो सहभागी झाला होता. याच निमित्ताने मिलिंद अंकिताच्या पालकांना भेटला आणि अंकिताशी लग्न करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. आधी अंकिताचे पालक वयाच्या अंतरावरून या लग्नासाठी राजी नव्हते. पण मिलिंदला प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांनी या लग्नाला होकार दिल्याचे कळतेयं. मिलिंदने त्यांना प्रचंड प्रभावित केल्याचेही समजतेयं.

ALSO READ : मिलिंद सोमण करणार स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या गर्लफ्रेन्डशी लग्न?

अंकिता गुवाहाटीची राहणारी आहे. २०१३ मध्ये ती एअर एशियाच्या केबिन क्रूचा भाग होती. या अर्थाने मिलिंदची ही गर्लफ्रेन्ड १८ वर्षांची नसून कदाचित २३-२४ वर्षांची असावी. कारण एअरलाईन्समध्ये जॉब करण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली हवीत.अंकिता तूर्तास दिल्लीत राहते. अंकिताला हिंदी, बांगला, आसामी याशिवाय फ्रेंच आणि इंग्रजी या भाषा येतात. मुव्हीज पाहणे आणि स्वीमिंग तिचे छंद आहेत. तिला भटकायलाही जाम आवडते. कदाचित त्याचमुळे वयात ३० वर्षांचा फरक असूनही मिलिंद व तिची केमिस्ट्री इतकी जबरदस्त आहे. 
अंकिताने २०१५ मध्ये मिलिंदसोबत १० हजार किमीची मॅराथॉन पूर्ण केली होती. मिलिंद प्रत्येक पोस्टमध्ये तिचा उल्लेख श्रीमती असा करतो.
२००६ मध्ये मिलिंद सोमणने  फ्रेंच अभिनेत्री मिलेन जम्पनोइ हिच्यासोबत लग्न केले होते. अर्थात हे नाते फार काळ टिकले नाही.  मिलिंद ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात अखेरचा दिसला होता. सध्या मिलिंद फिटनेस प्रमोटर आहे. १९ जुलै २०१६ रोजी मिलिंदने आयर्न मॅन कॉन्टेस्ट जिंकले होते.   ३.८ किमी स्विमींग, १८०.२ किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी रनिंग १५ तास १९ मिनिटांत पूर्ण करत त्याने हा किताब आपल्या नावावर केला होता.
 

Web Title: Milind Soman has made a mistake! The ring in the finger of the girlfriends !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.