मिलिंद सोमणने दिला सात तास रनिंग करण्याचा सल्ला; युजर्सने म्हटले, ‘आम्हाला बायको पोरं आहेत’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 17:35 IST2018-01-17T12:03:42+5:302018-01-17T17:35:34+5:30
अभिनेता मिलिंद सोमणने ट्विटरवर एक ट्विट केले. ज्यामध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना सल्ला देताना म्हटले की, दररोज सात तास रनिंग करा. त्यावर त्यांनी दिलेला रिप्लाय वाचून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

मिलिंद सोमणने दिला सात तास रनिंग करण्याचा सल्ला; युजर्सने म्हटले, ‘आम्हाला बायको पोरं आहेत’!
म डेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसबाबत खूपच सतर्क आहे. त्यासाठी ५३ वर्षीय मिलिंद त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेताना दिसतो. महामॅरेथॉनमध्ये भाग घेण्याबरोबरच स्विमिंग आणि सायकलिंगमध्येही मिलिंद चॅम्पियन आहे. नव्या वर्षानिमित्त त्याने फिट राहण्यासाठी आणखी एक संकल्प केला आहे. मात्र त्याचा हा संकल्प नेटिझन्सना फारसा पटला नसावा. त्याचे झाले असे की, नव्या वर्षानिमित्त मिलिंदने सोशल मीडियावर एक ट्विट शेअर केले. ट्विटमध्ये त्याने लिहिले की, ‘दररोज सात तास रनिंग करणार, तुम्हीही करा.’ परंतु चाहत्यांना त्याचा हा सल्ला फारसा पटला नाही. त्यांनी त्याला असा काही रिप्लाय दिला जे वाचून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.
गेल्या सोमवारी मिलिंदने ट्विटमध्ये लिहिले की, ‘मित्रांनो, यावर्षी मी नवा फिटनेस रिजोल्यूशन सुरू करणार आहे. प्रत्येक दिवशी सात तास मॅरेथॉन, होय तुम्ही एकदम बरोबर वाचले आहे. तुमच्यापैकी कोण मला ज्वाइन करू इच्छिणार?’ मिलिंदच्या या ट्विटला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. आतापर्यंत १६०० पेक्षा अधिक रिट्विट त्याच्या ट्विटला करण्यात आले आहे. एका युजरने लिहिले की, ‘मी एक नोकरदार असून, मला पत्नी आणि मुले आहेत’, तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘आम्हाला आॅफिसला पण जावे लागते.’
सुपरमॉडेल राहिलेल्या मिलिंद सोमणने १९९५ मध्ये अलिशा चिनॉयच्या ‘मेड इन इंडिया’ या म्युझिक व्हिडीओमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. अलिशाचे हे गाणे संपूर्ण देशात सुपरहिट राहिले. त्यामुळे संपूर्ण देशात मिलिंद सोमण हा चेहरा लोकप्रिय झाला. मिलिंद सोमण रनिंगबरोबरच छोट्या-मोठ्या भूमिका साकारत आला आहे. अखेरीस तो अभिनेता सैफ अली खानच्या ‘शेफ’मध्ये बघावयास मिळाला होता.
सध्या मिलिंद त्याच्या लव्हलाइफमुळे चर्चेत आहे. त्याच्यापेक्षा जवळपास ३४ वर्षांनी लहान असलेल्या एअरहोस्टेस अंकिता कोनवार या तरुणीला तो डेट करीत आहे. असे म्हटले जात आहे की, अंकिताचे वय १९ वर्षे इतके आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच मिलिंदने याबाबतचा खुलासा करताना तिचे वय १९ नसून २६ वर्षे इतके असल्याचे सांगितले होते. हे दोघे आॅक्टोबर २०१६ पासून एकमेकांना डेट करीत आहेत. मिलिंद अंकितासोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करीत असतो.

}}}} ">Guys this year, I’m starting a new fitness resolution! Doing a 7 Hour Marathon every day! Yup, you read that right. Who wants to join me? #7hourmarathon— Milind Usha Soman (@milindrunning) January 16, 2018
Guys this year, I’m starting a new fitness resolution! Doing a 7 Hour Marathon every day! Yup, you read that right. Who wants to join me? #7hourmarathon— Milind Usha Soman (@milindrunning) January 16, 2018