मिका सिंह, आता महाराष्ट्रात माईक पकडूनच दाखव!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 11:32 IST2017-08-04T06:01:48+5:302017-08-04T11:32:47+5:30
गायक मिका सिंह याला पाकिस्तान प्रेम चांगलचे नडले आहे. होय, त्याच्या पाकिस्तान प्रेमाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेने मिकाला ...

मिका सिंह, आता महाराष्ट्रात माईक पकडूनच दाखव!!
ग यक मिका सिंह याला पाकिस्तान प्रेम चांगलचे नडले आहे. होय, त्याच्या पाकिस्तान प्रेमाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेने मिकाला डोक्यावरून शिंगावर घेतले आहे. होय, मनसे नेते अमेय खोपकर यांनी मिकाला खुलेआम धमकी दिली आहे. मिका,आता तू महाराष्ट्रात माईक पकडून दाखवच, असे टिष्ट्वट खोपकर यांनी केले आहे.
मिकाने अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता या संपूर्ण प्रकरणाचे येत्या दिवसांत कसे पडसाद उमटतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आता हे संपूर्ण प्रकरण काय, हे आपण जाणून घेऊ यात. तर प्रकरणाचे मूळ आहे, १२ आॅगस्टच्या एका कार्यक्रमात. होय, येत्या १२ आॅगस्टला ह्युस्टन येथे मिकाचा एक शो होणार आहे. या शोपूर्वी मिकाने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांनी या शोमध्ये सामील व्हावे, असे आवाहन त्याने या व्हिडिओद्वारे केले होते. या व्हिडिओत मिकासोबत या शोचा एक पाकिस्तानी प्रमोटरही होता. या व्हिडिओत मिका असे काही बोलून गेला की, अमेय खोपकरशिवाय भारतातील अनेकांनी मिकाच्या या शोला विरोध केला आहे. ‘15 अगस्त को हमारा हिन्दुस्तान आजाद हुआ था और 14 को हमारा पाकिस्तान,’असे मिका या व्हिडिओत म्हणाला. मिकाचे ‘हमारा पाकिस्तान’ म्हणणे, भारतीयांना चांगलेच खटकले आहे.
तुम्हाला ठाऊक आहेच की, ऊरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी लादण्यात आली होती. यामुळे करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याला भूमिका देण्यावरूनही मोठे वादंग माजले होते. करणचा हा चित्रपट कदापि रिलीज होऊ देणार नाही, अशी धमकी यादरम्यानम मनसेने दिली होती. मात्र नंतर करणने राज ठाकरे यांची मनधरणी करत, हा चित्रपट रिलीज केला होता.
@MikaSingh a Pakistani Sympathizer how can he travel on INDIAN passport? @SushmaSwaraj@KirenRijiju @republic@indiatvnewspic.twitter.com/zfeQ52HoNI— No Conversion (@noconversion) August 1, 2017
@MikaSingh@mnsadhikrut Mika Singh is doing 'Hamara Pakistan' Concert in USA!!Open Challenge to him, Try holding 'MIC' in Maharashtra Now