आपल्या मम्मी-पप्पांसोबत मीशाने कापला केक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:36 IST2017-08-30T08:48:51+5:302018-04-03T14:36:06+5:30
काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लाडकी लेक मीशा हिने आपला पहिला बर्थ डे सेलिब्रेट केला आहे. ...
.jpg)
आपल्या मम्मी-पप्पांसोबत मीशाने कापला केक
एका इंटरव्ह्यु दरम्यान मीराने सांगितले होते कि आपल्या मुलीचा बर्थ डे तिला अतिशय साध्या पद्धतीने सिलिब्रेट करायचा होता. मीशाचा बर्थ डे पार्टीत शाहिदचे कुटुंबीय आणि मीराच्या कुटुंबीयांसह काही जवळचे मित्र उपस्थित होते. सोशल मीडियावर मीशाचा आजीसोबत शॉपिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती गॉगल्सच्या काऊंटरसमोर उभी दिसते आहे.
सध्या शाहिद त्याच आगामी चित्रपट पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र या व्यस्त शेड्यूलमधून ही त्यांने आपल्या लेकीच्या पहिल्या बर्थ डेसाठी वेळ काढला. मीरा आणि शाहिद मीशासह बर्थ डेच्या एक आठवडाआधीच लंडनला रवाना झाले होते. लंडनमध्ये मीशाचे पप्पा शाहिदसोबत खेळतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.