भेटा: ‘दंगल’ गर्ल्सला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 13:42 IST2016-10-20T13:42:30+5:302016-10-20T13:42:30+5:30

‘दंगल’ या आमीर खानच्या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. ‘दंगल’च्या प्रोजेक्टवर काम सुरु झाले तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत ...

Meet: 'Dangle' Girls! | भेटा: ‘दंगल’ गर्ल्सला!

भेटा: ‘दंगल’ गर्ल्सला!

ंगल’ या आमीर खानच्या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. ‘दंगल’च्या प्रोजेक्टवर काम सुरु झाले तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आहे. आज याचा धमाकेदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ हा चित्रपट हरियाणातील कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या जीवनावर आधारित आहे. ‘दंगल’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्षांनंतर आमीर या चित्रपटात काही नव्या चेह-यांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात एक नाही, दोन नाही तर चार ‘ब्युटिफुल गर्ल्स’ आहेत. या चौघीही आमीरच्या मुलींची भूमिका साकारताना यात दिसणार आहे. या चौघी म्हणजे, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, जाहिरा वसीम आणि सुहानी भटनागर. जाहिरा आणि सुहानी या दोघी फातिमा आणि सान्या या दोघींच्या बालपणीची भूमिका साकारणार आहेत. या चौघींच्या शोधासाठी आमीरने जणू आकाश-पाताळ एक केले होते. देशाच्या अनेक राज्यांचे दौरे केले. २२ हजारांवर मुलींच्या आॅडिशननंतर ‘दंगल’साठी या चौघींची निवड झाली.  या  चौघींविषयी आपण जाणून घेणार आहोत...

फातिमा सना शेख


फातिमा सना शेख यापूर्वीही पडद्यावर दिसलीय. होय, तांत्रिकदृष्ट्या ‘दंगल’ हा फातिमाचा बॉलिवूड डेब्यू नाही. तर यापूर्वी बालकलाकार म्हणून ती मोठ्या पडद्यावर दिसली आहे. होय, कमल हासन यांचा ‘चाची ४२०’ आठवतोय? त्यातली क्यूट बेबी म्हणजेच फातिमा. पाच वर्षांच्या फातिमाने या चित्रपटात साकारलेली भूमिका सगळ्यांच्या मनाला स्पर्शून गेली होती. हीच फातिमा आता आमीर खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ती या चित्रपटात आमीरची मुलगी अर्थात गीता फोगाट हिची भूमिका साकारताना दिसणार आहे. २४ वर्षांच्या फातिमाने ’बिट्टू बॉस’, ‘आकाशवाणी’ या काही चित्रपटातही भूमिका साकारली आहे. एका टीव्ही शोमध्येही ती झळकली आहे. ‘दंगल’साठीच्या भूमिकेसाठी फातिमाने तिची सगळ्यात आवडती गोष्ट गमावली. ती म्हणजे तिचे केस. लांबसडक केस कापून तिने या बॉब कट केला.

सान्या मल्होत्रा

सान्या मल्होत्रा ही मुळची दिल्लीची. बॉलिवूडमध्ये करिअर करण्याच्या महत्त्वाकांक्षेने ती मुंबईला आली. ती एक उत्कृष्ट बॅले डान्सर आहे. फातिमा हिच्यासारखेच सान्याला सुद्धा सन्या ‘दंगल’साठी केस कापावे लागले. ती या चित्रपटात आमीरची दुसरी मुलगी बबीता कुमारी हिची भूमिका साकारणार आहे.

जाहिरा वसीम



जाहिरा वसीम ही काश्मिीरी गर्ल.  हजारो मुलींमधून ‘दंगल’साठी जाहिराची निवड झाली. शाळेतील नाटकांमध्ये लहान -मोठ्या भूमिका करता करता झाहिराला अचानक आमीर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. कास्टिंग डायरेक्टरने शाळेतील नाटकातला तिचा अभिनय पाहिला होता. याच आधारावर तिला ‘दंगल’च्या आॅडिशनसाठी बोलवण्यात आले आणि तिची निवडही झाली. दहावीत शिकणाºया जाहिराने ‘दंगल’आधी  दोन जाहिरातींमध्ये काम केले होते. ‘दंगल’साठी केस कापावे लागले त्यावेळी जाहिरा अक्षरश: हुमसून हुमसून रडली. पण बॉलिवूडच्या परफेक्शनिस्टसोबत काम करण्याच्या आनंदासमोर ती हे अश्रू लगेच विसरली.

सुहानी भटनागर



सुहानी ही दिल्ली गर्ल ‘दंगल’मध्ये बबिता कुमारीच्या बालपणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी सुहानीने बॉलिवूडमध्ये काम केलेले नाही. पण अनेक जाहिराती, कॅटलॉग शूटसाठी तिने काम केले आहे. आमीरसोबत काम करणे तिच्यासाठी एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.
 
  

Web Title: Meet: 'Dangle' Girls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.