mass molestation in Bengaluru : नेत्यांच्या बेताल वक्तव्यावर बॉलिवूड सेलब्सची चपराक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 22:38 IST2017-01-03T22:13:24+5:302017-01-03T22:38:56+5:30
नववर्षाचा जल्लोष साजरा केला जात असताना बेंगलरूमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे या उत्सवाला गालबोट लागले आहे. यानंतर आलेल्या प्रतिक्रियेवर अनेकांनी ...

mass molestation in Bengaluru : नेत्यांच्या बेताल वक्तव्यावर बॉलिवूड सेलब्सची चपराक!
बंगळुरू येथील ब्रिगेड रोड व एम. जी. रोडच्या जंक्शनवर नववर्षाच्या पार्टीत पोलिसांची सुरक्षा व्यवस्था असतानाही काही महिलांचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती. यावर महिलांनी आपला रोष व्यक्त केला होता. यानंतर या घटनेबाबत राजकीय वतुर्ळातून वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली होती. या प्रकारास पाश्चात्य आचार-विचार जबाबदार असल्याचे वक्तव्य कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी केले होते. तर समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू असिम आझमी यांनीही महिलांनी परिधान केलेले शॉर्ट ड्रेस या घटनेला कारणीभूत असल्याचे म्हटले होते. जितकी नग्नता तितकी फॅशन जास्त, असे महिलांना वाटते असेही आझमी म्हणाले होते.
यावर बॉलिवूडमधून पडसाद उमटायला सुरुवात झाली अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर यांने आपल्या ट्विटरहून अबू आझमी यांना मुलींना पाश्चात्यांचे अनुकरण करणारे स्वत: वेस्टर्न शर्ट घालतात अशी टीका केली. यानंतर आमीर खाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, ‘तरुणींची छेडछाड करणाºयांच्या मनामध्ये आपल्याला फार मोठी शिक्षा होणार नाही, अशी भावना आहे. त्यामुळे अशा घटनानंतर तात्काळ आणि कठोर शिक्षा करुन त्यांना धडा शिकवायला हवा, असे मत व्यक्त केले.
यानंतर महिलांच्या नकारावर आधारित चित्रपटात प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री तापसी पन्नू हिने देखील आपले मत मांडले आहे. तिने केलेल्या ट्विट नुसार, ‘‘कदाचित मी अबू आझमी यांना माझ्या पिंक या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रि निंगची तिकिटे दिली असती. तर त्यांनी हा चित्रपट नक्कीच पाहिला असता.’’ तिच्या या ट्विटमधून तिचा राग स्पष्ट जाणवत होता. यावर अभिनेता वरुण धवन यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहले, ‘‘सर गुन्हेगारांना शिक्षा द्या, पीडितांना देऊ नका, महिला आपल्या इच्छेप्रमाणे क पडे परीधान करू शकतात’’.