लग्न-घटस्फोट-लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 14:37 IST2018-03-20T09:07:39+5:302018-03-20T14:37:39+5:30
देशात सर्वात महागडा घटस्फोट म्हणून उल्लेख केल्या गेलेल्या अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पूर्व पत्नी सुजैन खान हे पुन्हा ...

लग्न-घटस्फोट-लग्न!
दिलीपकुमार - सायरा बानो
सुपरस्टार दिलीपकुमार आणि सायरा बानो या दाम्पत्यानेदेखील घटस्फोटानंतर पुन्हा एकदा लग्न करून आयुष्याच्या गाठी बांधल्या. दिलीपकुमार यांनी पाकिस्तानातील अस्मा नावाच्या महिलेसाठी सायरा बानो यांना घटस्फोट दिला होता. १९८० मध्ये दिलीपकुमार यांनी अस्मासोबत विवाह केला. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी त्यांना आपली चूक लक्षात आली. पुढे त्यांनी पुन्हा एकदा सायरा बानो यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडून झालेली चूक सुधरविण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा सायरा बानो यांच्याशी निकाह केला.
अनू कपूर - अनुपमा
अभिनेते अनू कपूर यांनी अनुपमा नावाच्या महिलेशी विवाह करून सुखी संसार थाटला. काही काळानंतर अनू कपूर आणि अनुपमा यांनी घटस्फोट घेत विभक्त होणे पसंत केले. परंतु कदाचित यांचे विभक्त होणे जवळपास अशक्य असल्याने पुन्हा एकदा अनू कपूर आणि अनुपमा यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. वास्तविक दोघांनाही त्यांच्याकडून झालेली चूक लक्षात आली अन् २००८ साली त्यांनी पुन्हा लग्न केले.
पूजा घई - नीरव
अभिनेता इमरान खान आणि सोनम कपूरच्या चित्रपटातील ‘बहारा बहारा’ या गाण्यात बघावयास मिळालेली तरुणी दुसरी-तिसरी कोणीही नसून पूजा घई आहे. पूजाने २००७ साली नीरवसोबत अग्नीला साक्षी ठेवून साताजन्माच्या गाठी बांधल्या होत्या. परंतु तिचे लग्न काही महिनेच टिकू शकले. पुढे या दोघांनी घटस्फोट घेत विभक्त होणे पसंत केले. मात्र २०१० साली या दोघांना त्यांची चूक लक्षात आली अन् त्यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. २०१० साली हे दोघेही पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले.
संजय गुप्ता - अनु
चित्रपटात आपल्या अॅक्शनसाठी प्रसिद्ध असलेला संजय गुप्ता फॅशन डिझायनर अनुच्या प्रेमात पडला. बरेच वर्ष दोघांची लव्हस्टोरी चालली. त्यानंतर १९९७ मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले. मात्र काही वर्ष संसार केल्यानंतर त्यांनी २००४ मध्ये घटस्फोट घेतला. पाच वर्ष दोघेही एकमेकांपासून दूर राहिले. मात्र एकमेकांशिवाय आयुष्य अर्धवट असल्याची त्यांना जाणीव झाली. पुढे २००९ मध्ये सर्व गैरसमज दूर करीत त्यांनी पुन्हा लग्न केले.