"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 12:43 IST2025-11-09T12:41:56+5:302025-11-09T12:43:35+5:30
शाल्मली हिंदू आहे तर फरहान मुस्लीम. पण, आंतरधर्मीय लग्नाला दोन्ही कुटुंबातून विरोध नव्हता. उलट फरहानसोबत लग्न करणार असल्याचं सांगितल्यावर शाल्मलीच्या आईने तिला दोन बोल्ड प्रश्न विचारले होते.

"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
मराठी गायिका शाल्मली खोलगडे हिने २०२१ साली फरहान शेखसोबत लग्न करत संसार थाटला. शाल्मली हिंदू आहे तर फरहान मुस्लीम. पण, आंतरधर्मीय लग्नाला दोन्ही कुटुंबातून विरोध नव्हता. उलट फरहानसोबत लग्न करणार असल्याचं सांगितल्यावर शाल्मलीच्या आईने तिला दोन बोल्ड प्रश्न विचारले होते. ज्यामुळे शाल्मलीही आश्चर्यचकित झाली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत सांगितलं.
शाल्मली आणि तिचा नवरा फरहान यांनी हॉटरफ्लायला मुलाखत दिली. या मुलाखतीत फरहान म्हणाला, "माझी आणि शाल्मलीची फॅमिली धर्माबाबत सुशिक्षित आहेत. त्यामुळे आमच्या लग्नाला कोणीही विरोध केला नाही किंवा तुम्ही असं कसं करू शकता? असंही कोणी म्हटलं नाही. धर्मांतर केलं पाहिजे, असंही कोणी बोललं नाही", असं फरहान म्हणाला. तर फरहानशी लग्न करायचंय असं सांगितल्यावर शाल्मलीच्या आईने तिला बोल्ड प्रश्न विचारला होता. शाल्मलीने मुलाखतीत याचा खुलासा केला.
ती म्हणाली, "जेव्हा मी माझ्या आईला आमच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं तेव्हा माझ्या आईने मला दोन प्रश्न विचारले होते. तुम्ही मुलांबद्दल बोलला आहात का? तर मी तिला सांगितलं की हो आम्ही याबद्दल बोललो आहोत. नंतर तिने विचारलं की तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत? मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं चांगले आहेत. त्यानंतर ती मला ग्रेट असं म्हणाली. जर या दोन प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसतील मग त्यामागे काहीही कारण असू दे...पण, मग तुम्ही तुमच्या नात्याचा विचार केला पाहिजे".
दरम्यान, शाल्मली आणि फरहान लग्नाआधी काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. शाल्मालीने परेशान (इशकजादे), दारू देसी (कॉकटेल) आणि बलम पिचकार (ये जवानी है दिवानी) यांसारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. तिने म्युझिक रिअॅलिटी शो, इंडियन आयडॉल ज्युनियर आणि सूर नवा ध्यास नवा यांत परीक्षक पदाची जबाबदारीही सांभाळली होती. हिंदीव्यतिरिक्त, तिने मराठी, बंगाली, तेलुगू आणि तामिळ अशा अन्य भारतीय भाषांमधूनही गाणी गायली आहेत. तर फरहानदेखील साऊंड इंजिनियर आहे.