'घर से निकलते ही..' या गाण्यातून रातोरात स्टार झालेली मराठमोळी अभिनेत्री आज कमावतेय कोट्यावधी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 06:57 PM2020-08-21T18:57:37+5:302020-08-21T18:59:16+5:30

नव्वदच्या दशकातील लोकप्रिय चित्रपट 'पापा कहते हैं'मधील अभिनेत्री बऱ्याच काळापासून बॉलिवूडमधून आहे गायब

The Marathi actress who starred overnight in the song 'Ghar Se Niklate Hi ..' earns crores of rupees today | 'घर से निकलते ही..' या गाण्यातून रातोरात स्टार झालेली मराठमोळी अभिनेत्री आज कमावतेय कोट्यावधी रुपये

'घर से निकलते ही..' या गाण्यातून रातोरात स्टार झालेली मराठमोळी अभिनेत्री आज कमावतेय कोट्यावधी रुपये

googlenewsNext

‘घर से निकलते ही, कुछ दूर चलतेही, रस्ते मैं है उसका घर’ हे गीत आजही अनेकांच्या ओठांवर रुळताना दिसते. या गाण्यामुळे एका रात्रीत अभिनेत्री मयुरी कांगो स्टार झाली होती. 'पापा कहते है' या चित्रपटातील हे गाणे आहे. या चित्रपटातील मयुरी कांगोची निरागसता आणि क्यूटनेस प्रेक्षकांना खूप भावला. मयुरी बऱ्याच काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. ती शेवटची 2000 साली प्रदर्शित झालेल्या तेलगू चित्रपट वामसीमध्ये झळकली होती. त्यानंतर ती कोणत्याच इव्हेंट किंवा पार्टीमध्ये दिसली नाही. आता तिच्या कौटुंबिक जीवनात आणि बिझनेसमध्ये व्यग्र आहे. सध्या ती गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड म्हणून कार्यरत आहे.

1995 मध्ये मयुरी कांगो सुरुवातीला नसीम या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावले होते. तिचा अभिनय चित्रपट-दिग्दर्शक महेश भट यांना खूप आवडला होता. त्यामुळे 1996 मध्ये महेश भट यांनी मयुरीला माझ्यासोबत चित्रपटात काम करशील का ? अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी ‘पापा कहते है’ हा चित्रपट निर्माण केला. या चित्रपटात जुगल हंसराजने भूमिका केली आहे. या चित्रपटातील ‘घर से निकलते ही कुछ दूर चलते ही’ हे गाणे एवढे गाजले की घराघरात पोहोचले.



'पापा कहते है' आणि 'होगी प्यार की जीत' या दोन चित्रपटांशिवाय तिचा एकही सिनेमा फारसा चालला नाही. २००० मध्ये आलेल्या वामसी या तेलगु सिनेमात ती दिली. मोठ्या पडद्यावर यश मिळत नाही म्हटल्यावर तिने मालिकेत काम केले.

‘नरगिस’, ‘थोड़ा गम, थोड़ी खुशी’, ‘डॉलर बाबू’ आणि ‘किट्टी पार्टी’ या मालिकांमध्ये काम केलं. मात्र इथेही तिला फारसं यश मिळालं नाही. मग तिने 2003 मध्ये एनआरआय आदित्य ढिल्लनशी लग्न केलं आणि अमेरिकेत सेटल झाली. तिथे तिने एमबीएचं शिक्षण घेतलं आणि २००४ ते २०१२ पर्यंत नोकरी केली.

मयुरीला 9 वर्षांचा एक मुलगा आहे. त्याच्या जन्मानंतर ती भारतात परतली होती. भारतात परतल्यानंतरही तिने आपले कुटुंब आणि नोकरीला प्राधान्य दिले.

Web Title: The Marathi actress who starred overnight in the song 'Ghar Se Niklate Hi ..' earns crores of rupees today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.