आमिरची लेक आयरा आणि नुपूरसाठी मराठमोळ्या सोनालीची खास पोस्ट, म्हणाली, "माझा सुपर कूल ट्रेनर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 11:34 AM2024-01-17T11:34:00+5:302024-01-17T11:34:40+5:30

"प्रिय आमिर...", सोनाली कुलकर्णीने आयरा आणि नुपूरला दिल्या हटके शुभेच्छा

marathi actress sonali kulkarni shared special post for aamir khan daughter ira khan and nupur shikhare | आमिरची लेक आयरा आणि नुपूरसाठी मराठमोळ्या सोनालीची खास पोस्ट, म्हणाली, "माझा सुपर कूल ट्रेनर..."

आमिरची लेक आयरा आणि नुपूरसाठी मराठमोळ्या सोनालीची खास पोस्ट, म्हणाली, "माझा सुपर कूल ट्रेनर..."

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. आयराने नुपूर शिखरेशी विवाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आयरा आणि नुपूरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांना अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट करत आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही आयरा आणि नुपूरला खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

आमिरचा जावई नुपूर हा एक फिटनेस ट्रेनर आहे. अनेक सेलिब्रिटींना त्याने फिटनेसचं ट्रेनिंग दिलं आहे. आमिरचाही तो फिटनेस ट्रेनर होता. तर मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलाही नुपूर फिटनेसचं ट्रेनिंग देत आहे. आपला फिटनेस ट्रेनर आणि आमिरच्या लेकीसाठी सोनालीने खास पोस्ट लिहिली आहे. "माझा सुपर कूल ट्रेनर नुपूर आणि सुंदर आयरा तुमचं मनापासून अभिनंदन. एकत्र राहण्याची जादू तुम्ही अनुभवा आणि प्रत्येक दिवस साजरा करा," असं सोनालीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुढे सोनालीने आमिरलाही शुभेच्छा दिल्या आहेत. 

"प्रिय आमिर, तुझा विनम्रपणा आणि प्रेमळपणा वेगळा आहे. हे क्षण कायमच लक्षात राहतील. देवाची तुझ्यावर कृपा राहू दे. खूप प्रेम", असंही सोनालीने पुढे म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. आयरा-नुपूरने कोर्ट मॅरेज केल्यानंतर ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर मुंबईत त्यांचं ग्रँड वेडिंग रिसेप्शन पार पडलं. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूडसह मराठीतील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. सोनाली कुलकर्णीनेही आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली होती. 
 

Web Title: marathi actress sonali kulkarni shared special post for aamir khan daughter ira khan and nupur shikhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.