सई ताम्हणकरची बॉलिवूडमध्ये हवा! फरहान अख्तरच्या चित्रपटात एंट्री, पाहा Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 04:02 PM2023-09-18T16:02:11+5:302023-09-18T16:03:06+5:30

बॉलिवूडमधील प्रसिद्ध एक्सेल एंटरटेन्मेंटकडून सईला सिनेमाची ऑफर आली आहे.

marathi actress saie tamhankar to work in farhan akhtar s excel entertainment movie | सई ताम्हणकरची बॉलिवूडमध्ये हवा! फरहान अख्तरच्या चित्रपटात एंट्री, पाहा Photo

सई ताम्हणकरची बॉलिवूडमध्ये हवा! फरहान अख्तरच्या चित्रपटात एंट्री, पाहा Photo

googlenewsNext

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने (Saie Tamhankar) बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका गाजवला आहे. 'मिमी' सिनेमात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली. यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. आता सईला आणखी एका सिनेमाची लॉटरी लागली आहे. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध कंपनीकडून तिला ही ऑफर आली आहे.सईने फोटो शेअर करत ही माहिती दिली असून आता ती आणखी एका धमाक्यासाठी सज्ज आहे.  

सईला कोणत्या बॅनरचा मिळाला सिनेमा 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध एक्सेल एंटरटेन्मेंटकडून सईला सिनेमाची ऑफर आली आहे. एक्सेल एंटरटेन्मेंट ही कंपनी रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर (Farhan Akhtar) यांची आहे. 'दिल चाहता है', 'डॉन', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सारखे अनेक सुपरहिट चित्रपट या बॅनरखाली बनले आहेत. सईलाही त्याच्या आगामी सिनेमाची ऑफर मिळाली आहे. प्रोडक्शन कंपनीकडून तिला मिळालेल्या लेटरचा फोटोही तिने शेअर केलाय. यात तिने सिनेमाचं नाव मात्र लपवलं आहे. 

प्रिय सई, तुझ्यासोबत पुन्हा काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि तुला ....या सिनेमाचा भाग बनवून घेण्यासाठी खूप उत्सुक आहोत. तुझ्यासोबत हा नवीन प्रवास सुरु होतोय याचा आनंद आहे. - रितेश + फरहान.

म्हणजेच काय तर आपली मराठमोळी सई थेट फरहान अख्तरच्या सिनेमात झळकणार आहे. एक्सेल एंटरटेन्मेंट सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. यामध्ये 'डॉन 3', 'फुकरे 3', 'जी ले जरा', 'आर्चीज' हे चित्रपट आहेत. आता यापैकीच एक की आणखी कोणत्या वेगळ्याच सिनेमात सई झळकणार हे गुलदस्त्यातच आहे. 

सईने नुकतंच नवीन घर घेतल्याचीही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. तिच्या घराची झलक ती युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांना दाखवणार आहे. the eleventh place या नावाने तिचा पहिला एपिसोड उद्या अपलोड होणार आहे.

Web Title: marathi actress saie tamhankar to work in farhan akhtar s excel entertainment movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.