मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कार्तिक आर्यनबरोबर करणार स्क्रीन शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 05:25 PM2023-12-11T17:25:11+5:302023-12-11T17:25:59+5:30

आणखी एका मराठी अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली आहे. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची हिंदी सिनेमात वर्णी लागली आहे.

marathi actor aroh welankar to make his bollywood debut with kartik aaryan film | मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कार्तिक आर्यनबरोबर करणार स्क्रीन शेअर

मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कार्तिक आर्यनबरोबर करणार स्क्रीन शेअर

अनेक मराठी कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये जम बसवला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' सिनेमात उपेंद्र लिमये या मराठमोळ्या अभिनेत्याने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर अलिकडेच रिलीज झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी'मध्ये क्षिती जोगला पाहून चाहते आनंदी झाले होते. आता आणखी एका मराठी अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली आहे. 'रेगे' फेम अभिनेता आरोह वेलणकर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवलेला आरोह आता बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची हिंदी सिनेमात वर्णी लागली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. आरोह वेलणकर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत एन्ट्री घेणार आहे. या सिनेमात तो कार्तिकबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

आरोहने कार्तिकबरोबरचा सिनेमाच्या सेटवरील फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचं त्याने म्हटलं आहे. आरोहने चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवलं आहे. "उत्कृष्ट लोकांबरोबर या भन्नाट चित्रपटाचं शूटिंग करताना मज्जा आली. माझी पहिला हिंदी चित्रपट", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी आरोहचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट करत सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. 

'रेगे' या सिनेमामुळे आरोह प्रसिद्धीझोतात आला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. त्यानंतर अनेक मराठी चित्रपटांत तो झळकला. 'लाडाची मी लेक गं' या मालिकेत आरोहने मुख्य भूमिका साकारली होती. 'बिग बॉस मराठी'मध्येही आरोह सहभागी झाला होता. 
 

Web Title: marathi actor aroh welankar to make his bollywood debut with kartik aaryan film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.