‘2.0’मध्ये दिसणार रजनीकांत अन् अक्षय कुमारचे अनेक अवतार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 12:21 IST2017-03-27T06:51:52+5:302017-03-27T12:21:52+5:30
यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर तुमच्या आमच्या भेटीला येऊ घातलेला ‘2.0’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात प्रथमच मेगास्टार रजनीकांत ...

‘2.0’मध्ये दिसणार रजनीकांत अन् अक्षय कुमारचे अनेक अवतार!
य दा दिवाळीच्या मुहूर्तावर तुमच्या आमच्या भेटीला येऊ घातलेला ‘2.0’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात प्रथमच मेगास्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे अक्षय यात एका आगळ्यावेगळ्या लूकमध्ये आहे. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल, या चित्रपटात अक्षयचे एक नाही तर अनेक वेगवेगळे अवतार दिसणार आहेत. केवळ अक्षयच नाही तर रजनीकांतही वेगवेगळ्या रूपात यात पाहायला मिळणार आहे. होय, मीडियाचे मानाल तर रजनीकांत पाच वेगवेगळ्या गेटअपमध्ये यात दिसेल. आपला अक्की अर्थात अक्षयचे एक नाही, दोन नाही तर तब्बल १२ डिफरन्स लूक्स यात दिसतील.
यापूर्वी ही माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवली होती. चित्रपट रिलीज होण्याआधी यात हिरो आणि विलेनचे इतके लूक्स आहेत, ही माहिती प्रेक्षकांना कनफ्यूज तर करणार नाही ना? अशी एक भीती मेकर्सच्या मनात होती.
ALSO READ : रिलीजपूर्वीच ‘2.0’ची रेकॉर्ड कमाई!
२०१० मध्ये आलेल्या ‘रोबोट’ या सिनेमाचा ‘2.0’हा सीक्वल आहे. यात रजनीकांत एका वैज्ञानिकाच्या आणि रोबोटच्या दुहेरी भूमिकेत बघावयास मिळणार आहे. रजनीकांत व्यतिरिक्त अक्षयकुमारही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, तो यात खलनायक साकारत आहे. त्याचबरोबर एमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसेन यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. लायका प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत बनविण्यात येत असलेल्या या सिनेमात जबरदस्त अॅक्शन बघावयास मिळणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे.रजनीकांत यांनी ‘रोबोट’या सिनेमात वैज्ञानिक आणि रोबोटची भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या सिनेमातील स्टंट बघण्यासारखे होते. शिवाय तंत्रज्ञानाच्याही जबरदस्त वापर यात केल्याचे बघावयास मिळाले. आता ‘2.0’मध्येही अशाच प्रकारचे काहीसे स्टंट आणि तंत्रज्ञान बघावयास मिळण्याची शक्यता आहे.