मानुषी छिल्लरने पृथ्वीराज चव्हाण सिनेमाच्या स्क्रिप्ट वाचनाला केली सुरूवात, स्टायलिश अंदाजात कॅम-यात झाली कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 06:00 AM2020-10-08T06:00:00+5:302020-10-08T06:00:00+5:30

मानुषी तिच्या या बॉलिवूड पदार्पणाला घेवून खूप उत्सुक आहे. सध्या भूमिकेवर ती खप मेहनत घेत आहे. ही तर सुरूवात आहे. अजून खूप काही गोष्टी करायच्या आहेत. या सिनेमाची प्रोसेस मी खूप एन्जॉय करते.

Manushi spotted at YRF for Prithviraj script reading! | मानुषी छिल्लरने पृथ्वीराज चव्हाण सिनेमाच्या स्क्रिप्ट वाचनाला केली सुरूवात, स्टायलिश अंदाजात कॅम-यात झाली कैद

मानुषी छिल्लरने पृथ्वीराज चव्हाण सिनेमाच्या स्क्रिप्ट वाचनाला केली सुरूवात, स्टायलिश अंदाजात कॅम-यात झाली कैद

googlenewsNext

2017 रोजी मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावे केलं होतं. त्यानंतर तिच्याही बॉलिवूड पदार्पणाविषयी चर्चा रंगल्या होत्या. विश्वसुंदरी मानुषी लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. यशराज बॅनरचा सिनेमा 'पृथ्वीराज'मधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमात ती संयोगिताची भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत अक्षय कुमारही झळकणार आहे. अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार. लॉकडाऊनमुळे 'पृथ्वीराज' सिनेमाचे शूटिंग रखडले होते. कोरोनाकाळात या सिनेमाच्या शूटिंगलाही उशीर झाला नुकताच या सिनेमाच्या स्टारकास्टने कथेची वाचनला सुरूवात केली आहे. 


नुकतेच मानुषीलाही यशराजच्या ऑफिसमध्ये पाहिले गेले. तिनेही सिनेमाच्या स्क्रिप्टींगच्या वाचनाला सुरूवात केली आहे. यशराजच्या ऑफिसमध्ये बराच वेळ ती स्क्रिप्टींगचे वाचन करत होती. तिच्या भूमिकेविषयी बारकावे समजून घेत होती.सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकुमार द्विवेदीसह तिने सिनेमाच्या तयारीविषयी जाणून घेतले. यावेळी नेहमीप्रमाणे मानुषी स्टायलिश दिसत होती. गॉर्जियस लूकमध्ये मानुषीला पाहून तिचे चाहतेही फिदा होतील हे मात्र नक्की.या फोटोत ती सुंदर दिसत असून तिचा हटके लूक फॅन्सना भावतो आहे.तिची ही अदा कुणालाही घायाळ करणारी अशीच आहे. फोटोच्या निमित्ताने फॅन्सना तिची हटके स्टाईल पाहायला मिळते.

मानुषी तिच्या या बॉलिवूड पदार्पणाला घेवून खूप उत्सुक आहे. सध्या भूमिकेवर ती खप मेहनत घेत आहे. ही तर सुरूवात आहे. अजून खूप काही गोष्टी करायच्या आहेत. या सिनेमाची प्रोसेस मी खूप एन्जॉय करते. यशराज सारख्या मोठ्या बॅनरने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांच्या या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. त्यामुळे त्यांनी दिलेल्या संधीचे सोनं करत मला बेस्ट द्यायचे आहे. सध्या या सिनेमावरच मी लक्ष केंद्रित करत असल्याचे तिने सांगितले आहे. 
 

Web Title: Manushi spotted at YRF for Prithviraj script reading!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.