​मनोज कुमार यांना फाळके पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 08:20 IST2016-03-04T14:30:46+5:302016-03-04T08:20:42+5:30

‘पूरब और पश्चिम’, ‘उपकार’, ‘क्रांति’ यासारख्या देशभक्तिपर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांना आज शुक्रवारी सन ...

Manoj Kumar has been honored with the Phalke Award | ​मनोज कुमार यांना फाळके पुरस्कार जाहीर

​मनोज कुमार यांना फाळके पुरस्कार जाहीर

ूरब और पश्चिम’, ‘उपकार’, ‘क्रांति’ यासारख्या देशभक्तिपर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांना आज शुक्रवारी सन २०१५साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाला. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ७८ वर्षीय मनोज कुमार या पुरस्काराचे ४७ वे मानकरी ठरले आहेत. सुवर्णकमळ, १० लाख रुपए रोख आणि शाल व श्रीफळ असे भारतीय सिनेमातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखल्या जाणाºया या  पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘हरियाली और रास्ता’, ‘वो कौन थी’, ‘हिमालय की गोद में’, ‘दो बदन’, ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘पूरब और पश्चिम’, ‘शहीद’, ‘रोटी कपडा और मकान’ व ‘क्रांति’यांसारखे मनोज कुमार यांचे अनेक चित्रपट प्रचंड गाजले होते.


हरिकृष्ण गिरी गोस्वामी असे मनोज कुमार यांचे खरे नाव आहे. एबटाबाद येथे त्यांचा जन्म झाला होता. स्वातंत्र्यापूर्वी हा भारताचा भाग होता. ‘कांच की गुडिया’ या चित्रपदाद्वारे १९६० मध्ये मनोज कुमार यांनी एक रोमॅन्टिक हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र लवकरच त्यांचा अभिनयाचा फोकस बदलला आणि देशभक्तिपर चित्रपटांमुळे प्रशंसक त्यांना ‘भारत कुमार’ म्हणून ओळखू लागले. ‘उपकार’ या चित्रपटासाठी त्यांना नॅशनल फिल्म अवार्ड मिळाला होता. १९९२ मध्ये त्यांना पद्मश्रीने गौरविण्यात आले होते.

Web Title: Manoj Kumar has been honored with the Phalke Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.