मनोज वाजपेयीला 'द फॅमिली मॅन'साठी हवे तितके मिळाले नाही मानधन, म्हणाला - 'मी स्वस्त मजूर'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 08:19 PM2023-06-19T20:19:52+5:302023-06-19T20:20:33+5:30

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज वाजपेयी त्याचा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला चित्रपट 'सिर्फ एक बंदा काफी है'मुळे सध्या चर्चेत आहे.

Manoj Bajpayee didn't get what he wanted for 'The Family Man', says - 'I'm cheap labour' | मनोज वाजपेयीला 'द फॅमिली मॅन'साठी हवे तितके मिळाले नाही मानधन, म्हणाला - 'मी स्वस्त मजूर'

मनोज वाजपेयीला 'द फॅमिली मॅन'साठी हवे तितके मिळाले नाही मानधन, म्हणाला - 'मी स्वस्त मजूर'

googlenewsNext

अभिनेता मनोज वाजपेयी त्याचा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला चित्रपट 'सिर्फ एक बंदा काफी है'मुळे सध्या चर्चेत आहे. OTT च्या दुनियेत मनोज वाजपेयी 'द फॅमिली मॅन' आणि 'द फॅमिली मॅन २' मध्येही दिसला होता. अनेकांना वाटते की ओटीटी स्टार झाल्यानंतर अभिनेत्याची मागणी वाढली आहे, त्यामुळे मानधनही वाढले असेल. OTT वर काम करण्यासाठी इतर कोणत्याही मोठ्या स्टारला जेवढे पैसे मिळतात तेवढेच पैसे त्याला मिळू लागले असावेत. पण तसे नाही. मनोज वाजपेयीने सांगितले की, त्याला OTT वर काम करण्यासाठी जेवढे फी मिळायला हवे तेवढे अजूनही मिळत नाही.

नुकत्याच एका मुलाखतीत मनोज वाजपेयीने खंत व्यक्त केली. त्याने सांगितले की त्याला फॅमिली मॅनसाठी जितके पैसे मिळायला हवे होते तितके मिळाले नाहीत. 'अनफिल्टर्ड बाय समदीश' या यूट्यूब चॅनलशी झालेल्या मुलाखतीत मनोज वाजपेयीने त्याच्या बँक बॅलन्स आणि मानधनाबद्दल विचारण्यात आले. याला उत्तर देताना अभिनेत्याने सांगितले की तो 'गली गुलियां' आणि 'भोसले' सारख्या प्रोजेक्टमध्ये काम करूनही मोठी कमाई करू शकत नाही.

त्यांच्यासाठी आम्ही स्वस्त कामगार आहोत

जेव्हा मनोजला सांगण्यात आले की तो 'द फॅमिली मॅन' सारख्या मोठ्या शोचा भाग आहे, तेव्हा साहजिकच त्याला मोठे मानधन मिळाले असेल वाटत असेल ना. मात्र अभिनेत्याने ते नाकारले. तो म्हणाला की OTT लोक फक्त मोठ्या स्टार्सनाच पैसे देतात. ते रेग्युलर प्रोड्युसरपेक्षा कमी नाहीत. अभिनेता म्हणाला, 'द फॅमिली मॅन'साठी मला जी रक्कम मिळायला हवी होती ती मला मिळाली नाही. त्यानंतर अभिनेत्याने ओटीटीवर काम करणाऱ्या हॉलिवूड स्टार्सना दिल्या जाणाऱ्या फीबाबत धक्कादायक विधान केले. तो म्हणाला, 'गोरा आएगा, शो करेगा तो दे देंगे. चीनमध्ये मोठ्या ब्रँडचे कारखाने आहेत कारण तेथे कामगार स्वस्त आहे. तसेच त्यांच्यासाठी आम्ही स्वस्त कामगार आहोत. जेक रेयानला भरपूर पैसे मिळतील.

द फॅमिली मॅनमध्ये काम न करण्याचा पत्नीनं दिला होता सल्ला
'द फॅमिली मॅन'चा पहिला सीझन २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. ही एक स्पाय थ्रिलर मालिका आहे ज्यामध्ये मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहे. या शोचे दोन्ही सीझन सुपरहिट झाले होते आणि आता चाहते तिसऱ्या सीझनची म्हणजेच 'द फॅमिली मॅन ३'ची वाट पाहत आहेत. मनोज बाजपेयी यांनी सांगितले होते की, त्याच्या पत्नीने त्याला शो न करण्यास सांगितले होते, कारण तो त्याचे योग्य करिअर खराब करत आहेत. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, त्याने 'द फॅमिली मॅन'च्या तयारीसाठी नवीन असाइनमेंट आणि शो नाकारले होते.

Web Title: Manoj Bajpayee didn't get what he wanted for 'The Family Man', says - 'I'm cheap labour'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.