मनीषा कोईराला म्हणते, ‘नो चान्स’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2017 12:49 IST2017-05-21T07:19:36+5:302017-05-21T12:49:36+5:30

मनीषा कोईराला बॉलिवूड वापसीसाठी सज्ज आहे. ‘डिअर माया’ या चित्रपटाद्वारे मनीषा कमबॅक करतेय. या चित्रपटाबद्दल मनीषा कमालीची उत्सूक आहे ...

Manisha Koirala says, 'No Chance'! | मनीषा कोईराला म्हणते, ‘नो चान्स’!

मनीषा कोईराला म्हणते, ‘नो चान्स’!

ीषा कोईराला बॉलिवूड वापसीसाठी सज्ज आहे. ‘डिअर माया’ या चित्रपटाद्वारे मनीषा कमबॅक करतेय. या चित्रपटाबद्दल मनीषा कमालीची उत्सूक आहे आणि सध्या याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे, यानंतर पूर्णपणे चित्रपटांवर फोकस करण्याचे मनीषाने ठरवले आहे. 
अलीकडे एका मुलाखतीत, मनीषाने हा इरादा बोलून दाखवला. खरे तर मनीषाला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले होते. भविष्यात रिलेशनशिप किंवा लग्न, याकडे तू कशी बघतेस, असा प्रश्न तिला विचारला गेला. यावर मनीषाचे उत्तर अगदी स्पष्ट होते. आता मी लग्नाला नो चान्स देणार आहे, असे ती म्हणाली.  मला पुन्हा लग्नाच्या फेºयात अडकायचे नाही. ना कुठल्या रिलेशनशिपमध्ये गुंतायचे आहे. कॅन्सरशी लढताना मी अनेक अनुभव घेतले. खूप गोष्टी मला नव्याने समजून आल्यात.  आता आयुष्यात पुढे जाण्यासाठी मला कुठल्याही बंधनाची गरज उरलेली नाही. मला आता नव्या कल्पक गोष्टींचा आनंद लुटायचा आहे. माझे आयुष्य सिंगल राहूनच पूर्ण होऊ शकते, या ठाम मतापर्यंत मी पोहोचलेय. यापुढे काम आणि काम हेच माझ्या आयुष्याचे ध्येय असेल. कारण आता प्राथमिकता बदलल्या आहेत, ओ मनीषा म्हणाली.

ALSO READ : ​ मनीषा कोईराला ख-या आयुष्यातही बनणार आई!

‘डिअर माया’ ही कथा आहे, मायाची. मायाची ही व्यक्तिरेखा मनीषाने साकारली आहे. म्हातारपणाने काहीशी खंगलेली माया एका मोठ्या घरात एकटी राहत असते. तिचे हे एकटेपण पाहून तिच्या शेजारी राहणाºया दोन मुलींना तिच्यासाठी काहीतरी करावे, असे वाटते. मग त्या दोघी एका अनोळखी व्यक्तिच्या नावे मायाला प्रेमपत्र लिहायला सुरुवात करतात. ही प्रेमपत्रं वाचून माया त्या अनोळखी व्यक्तिच्या प्रेमात पडते आणि त्याला शोधण्यासाठी बाहेर पडते. आपली सगळी संपत्ती विकून माया त्या व्यक्तिच्या प्रेमाचा शोध घेण्याचा निर्णय घेते. इकडे मायाला आनंदी पाहण्यासाठी हा सगळा खटाटोप करणाºया त्या दोन मुली स्वत:ला दोषी मानू लागतात. त्यांची मैत्री तुटते. सरतेशेवटी या दोन मुली मायाचे विखुरलेले आयुष्य पूर्ववत करण्यासाठी पुढे येतात.

Web Title: Manisha Koirala says, 'No Chance'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.