मनीष म्हणतोय,‘शाहरूख होता राष्ट्रीय पुरस्कारास पात्र! ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 11:00 IST2016-05-05T05:30:25+5:302016-05-05T11:00:25+5:30

 दिग्दर्शक मनीष शर्माला ‘दम लगाके हैशा’ या चित्रपटासाठी ‘बेस्ट हिंदी चित्रपट’ अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एका मुलाखतीदरम्यान बोलताना मनीष ...

Manish says, 'Shahrukh was a national award! ' | मनीष म्हणतोय,‘शाहरूख होता राष्ट्रीय पुरस्कारास पात्र! ’

मनीष म्हणतोय,‘शाहरूख होता राष्ट्रीय पुरस्कारास पात्र! ’

 
िग्दर्शक मनीष शर्माला ‘दम लगाके हैशा’ या चित्रपटासाठी ‘बेस्ट हिंदी चित्रपट’ अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एका मुलाखतीदरम्यान बोलताना मनीष शर्मा म्हणाला,‘फॅन चित्रपटासाठी शाहरूख खानला नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळायला हवा होता.

त्याचा उत्तम अभिनय आणि चाहत्यांकडून त्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहता त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे अतिशय योग्य होते. शाहरूख त्याला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अतिशय आनंदी आहे. एक उत्तम चित्रपट साकारण्यात आला म्हणून चित्रपटाची संपूर्ण टीम खुप समाधानी आहे.

या चित्रपटाचे एक विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची व्यावसायिक अपेक्षा, हिरोईन, जास्त गाणी, डान्स नसतांनाही केवळ अभिनयाच्या आणि कथानकाच्या जोरावर चित्रपटाने योग्य संदेश चाहत्यांपर्यंत पोहोचवले.

यशराज फिल्मस बॅनरअंतर्गत या चित्रपटात शाहरूखने रसिकांच्या मनात एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून जी एक प्रतिमा निर्माण केली ती अत्यंत सुंदर आणि आव्हानात्मक होती.

Web Title: Manish says, 'Shahrukh was a national award! '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.