प्रेग्नेंट असल्याचे समजातच दु:खी झाली होती मंदिरा बेदी, वेगळ्याच चिंतेने झाली होती हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 01:14 PM2021-04-15T13:14:02+5:302021-04-15T13:33:15+5:30

Mandira Bedi talk about her pregnnacy :मंदिरा बेदीने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं तेव्हा फक्त ती 20 वर्षांची होती.

Mandira bedi talk about her pregnnacy and says i was scared that if i get pregnant | प्रेग्नेंट असल्याचे समजातच दु:खी झाली होती मंदिरा बेदी, वेगळ्याच चिंतेने झाली होती हैराण...

प्रेग्नेंट असल्याचे समजातच दु:खी झाली होती मंदिरा बेदी, वेगळ्याच चिंतेने झाली होती हैराण...

googlenewsNext

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. मंदिराचा जन्म 1972 साली कोलकाताला झाला. मात्र तिचे शिक्षम मुंबईतून झाले.  मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मंदिराच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याशी संबंधीत काही खास गोष्टी सांगणार आहोत. 


प्रेग्नेंट असल्याचे समजता दु:खी झाली होती मंदिरा
मंदिर बेदी इथंवरचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. काही वर्षापूर्वी एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने खुलासा केला की वयाच्या 39 व्या वर्षी ती आई झाली. 2011 मध्ये तिने आपल्या मुलास जन्म दिला. ती ज्या प्रोजेक्टसाठी काम करत होती त्यांच्यासोबत तिचा करार झाला होता. तिला भीती होती की जर ती प्रेग्रेंट राहिली तर तिचं करिअर संपेल. पुढे ती म्हणाली, मनोरंजन जगात महिलांचा करिअर जास्त मोठं नसतं. टिव्ही आणि सिनेमांमध्ये जास्त काम करणाऱ्या महिलांबाबत मला असुरक्षिततेची भावना होती. माझ्या पतीमुळे आमचा संसार यशस्वी होऊ शकला. 


मंदिरा बेदीने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं तेव्हा फक्त ती 20 वर्षांची होती. या क्षेत्रात आपलं विशेष स्थान मिळविण्यासाठी धडपडत होती.  मंदिराने 1994 मध्ये टीव्ही सीरियल 'शांती' पासून आपल्या करियरची सुरुवात केली होती. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या मालिकेत मंदिराला एक खास ओळख मिळाली. इतकेच नाही तर मंदिरा हे नाव घराघरात पोहोचले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

 

Web Title: Mandira bedi talk about her pregnnacy and says i was scared that if i get pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.