कमरेत हात घातला अन् अलगद खाली उतरवलं; पलक तिवारीला कडेवर घेणारा तो आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:29 IST2025-04-30T13:28:19+5:302025-04-30T13:29:56+5:30

या व्हिडिओत पलक तिवारी दिसताच चाहत्यांनी तिच्याभोवती गर्दी केल्याचं दिसत आहे. चाहत्यांनी गर्दी केल्यामुळे पलकला जीपमधून उरतताही येत नाहीये. तेव्हाच एक मुलगा पलकच्या मदतीसाठी धावून येत असल्याचं दिसत आहे.

man help palak tiwari to get down from car in music launch event video | कमरेत हात घातला अन् अलगद खाली उतरवलं; पलक तिवारीला कडेवर घेणारा तो आहे तरी कोण?

कमरेत हात घातला अन् अलगद खाली उतरवलं; पलक तिवारीला कडेवर घेणारा तो आहे तरी कोण?

इतर स्टारकिडप्रमाणेच पलक तिवारीदेखील लोकप्रिय स्टारकिड आहे. आई श्वेता तिवारीच्या पावलावर पाऊल टाकत पलकनेदेखील अभिनयात पदार्पण केलं आहे. पलक सध्या तिच्या 'द भूतनी' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत. नुकतंच या सिनेमातील गाण्यांचा प्रदर्शनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला पलक तिवारीनेदेखील हजेरी लावली होती. 

या इव्हेंटमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पलक तिवारी दिसताच चाहत्यांनी तिच्याभोवती गर्दी केल्याचं दिसत आहे. चाहत्यांनी गर्दी केल्यामुळे पलकला जीपमधून उरतताही येत नाहीये. तेव्हाच एक मुलगा पलकच्या मदतीसाठी धावून येत असल्याचं दिसत आहे. तो पलकला हात देतो. तिच्या कमरेत हात घालत तिला उचलून धरतो आणि अलगद खाली उतरवत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. पण, पलक तिवारीला गाडीतून खाली उतरवणारा हा मुलगा नक्की कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. विरल भय्यानीच्या इन्स्टाग्राम पेजवरुन पलक तिवारीचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 


दरम्यान, 'द भूतनी' सिनेमात सनी सिंह, पलक तिवारी, मौनी रॉय, आसिफ खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या १ मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: man help palak tiwari to get down from car in music launch event video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.