या भीतीने या बोल्ड अभिनेत्रीने नाकारली होती ‘प्लेबॉय’ची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 11:54 AM2019-10-24T11:54:29+5:302019-10-24T12:49:12+5:30

आपल्या हॉट अँड बोल्ड अवताराने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून देणा-या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस...

mallika sherawat get an offer from playboy magazine birthday special | या भीतीने या बोल्ड अभिनेत्रीने नाकारली होती ‘प्लेबॉय’ची ऑफर

या भीतीने या बोल्ड अभिनेत्रीने नाकारली होती ‘प्लेबॉय’ची ऑफर

googlenewsNext
ठळक मुद्देबॉलिवूडमध्ये येण्याआधी मल्लिकाने जाहिरात क्षेत्रात काम केले.

ख्वाहिश, मर्डर, डरना जरूरी है अशा 40 चित्रपटांत काम करणारी आणि आपल्या हॉट अँड बोल्ड अवताराने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून देणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत हिचा आज वाढदिवस. दीर्घकाळापासून बॉलिवूडपासून दूर असली तरी मल्लिका चर्चेत असते. परदेशातल्या मोठ्या इव्हेंटमध्ये ती आवर्जुन दिसते.


24 ऑक्टोबर 1976 मध्ये हरियाणातील हिसार जिल्ह्यात जन्मलेल्या मल्लिकाचे खरे नाव आहे,  रीमा लाम्बा आहे.  मल्लिकाच्या वडिलांचे नाव मुकेश कुमार लाम्बा आहे. मल्लिकाने हे नाव बदलून शेरावत हे आडनाव घेतले. शेरावत हे तिच्या आईच्या माहेरचे आडनाव आहे. आईने मल्लिकाला प्रत्येक गोष्टीत साथ दिली.  त्यामुळे ती अभिमानाने आईचे आडनाव तिच्या नावापुढे लावते.

तुम्हाला ठाऊक असेलच की, मल्लिका विवाहित आहे. होय, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच मल्लिकाचे लग्न झाले होते. आधी कुणालाही याची माहिती नव्हते. पण अचानक मल्लिकाच्या पहिल्या लग्नाचा खुलासा झाला होता.  दिल्लीत राहणारा एक पायलट करणसिंग गिल याच्याशी तिचे लग्न झाले होते. पण मल्लिकाला बॉलिवूड खुणावत होते. मल्लिकाने बॉलिवूडमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे पतीपासून ती वेगळी झाली.


बॉलिवूडमध्ये येण्याआधी मल्लिकाने जाहिरात क्षेत्रात काम केले. अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत अनेक दिग्गज स्टार्स सोबत तिने जाहिराती केल्या. काही म्युझिक व्हिडिओमध्ये देखील ती झळकली.


करीना कपूर-तुषार कपूर यांच्या ‘जीना सिर्फ मेरे लिए’ चित्रपटातून मल्लिकाने बॉलिवूड पदार्पण केले. यानंतर ‘ख्वाहिश’ हा चित्रपट तिला मिळाला. या चित्रपटातील तिने दिलेल्या किसींग सीनची प्रचंड चर्चा झाली.


मल्लिकाला खरी ओळख दिली ती २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने. या चित्रपटात इमरान हाश्मी सोबतच्या बोल्ड दृश्यांची बरीच चर्चा झाली. हा चित्रपट हिटही झाला. आजही मल्लिकाला ‘मर्डर गर्ल’ म्हणून ओळखले जाते.

 बॉलिवूडमधून ब्लॅकलिस्ट केल्या जाण्याच्या भीतीने मल्लिकाने एक ऑफर नाकारली होती. होय,  ‘प्ले बॉय’ या जगप्रसिद्ध मॅगझिनने मल्लिकाला कव्हर पेजवर न्यूड पोज देण्याची ऑफरदिली होती. ही ऑफर मिळालेली मल्लिका पहिली भारतीय अभिनेत्री होती. पण मल्लिकाने ही ऑफर नाकारली. न्यूड पोज दिल्यास आपल्याला बॉलिवूडमधून ब्लॅकलिस्ट केले जाईल, अशी भीती तिला होती.  

Web Title: mallika sherawat get an offer from playboy magazine birthday special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.