Malaika Arora Trolled: बोल्ड आऊटफिटमुळे ट्रोल झाली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "फॅशनच्या नावाखाली..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 12:02 PM2023-10-20T12:02:07+5:302023-10-20T12:22:43+5:30

मलायकाने एका इव्हेंटमध्ये खूपच बोल्ड ड्रेस घालून एंट्री केली. यावरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.

Malaika arora wore transparent outfi people got angry users said like urfi | Malaika Arora Trolled: बोल्ड आऊटफिटमुळे ट्रोल झाली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "फॅशनच्या नावाखाली..."

Malaika Arora Trolled: बोल्ड आऊटफिटमुळे ट्रोल झाली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "फॅशनच्या नावाखाली..."

'वय हा निव्वळ आकडा आहे', असं अनेकदा अभिनेत्री मलायका अरोराकडे (malaika arora) पाहिल्यावर म्हटलं जातं. कलाविश्वाप्रमाणेच (bollywood) मलायका सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. सोशल नेटवर्किंगवर अनेकदा मलायकाचे जीमच्या बाहेरील फोटो व्हायरल होत असतात. तिचे हे फोटो पाहिल्यावर अनेकदा चाहते तिच्या फिटनेसचं कौतुक करतात. सध्या मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यावरुन तिला ट्रोल करण्यात येतेय. 

 मलायकाने एका इव्हेंटमध्ये खूपच बोल्ड ड्रेस घालून एंट्री केली. मलायकाचा हा लूक लोकांना अजिबात आवडला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर तिला वाईट पद्धतीने ट्रोल करायला सुरुवात केली. लोकांनी तिची तुलना थेट उर्फी जावेदशी केली. 

मलायका एका इव्हेंटमध्ये ब्ल्यू शिमरी ड्रेस घालून पोहोचली होती. हेवी इयरिंग्स आणि केस मोकळे सोडून तिने आपला लूकपूर्ण केला. मलायकाचा ड्रेस दिसायला ट्रान्सपरेंट होता त्यामुळेच तिला ट्रोल करण्यात आलं. 

एका यूजरने लिहिले, उर्फी तर अशीच बदनाम आहे हिला बघा. दुसऱ्याने लिहिले, आजकाल फॅशनच्या नावाखाली काहीही करतात. आणखी एका यूजरने लिहिले, माझा पडदा परत कर. 

मलायका शेवटची 'मूविंग विद मलायका'मध्ये दिसली होती. याशोच्या माध्यमातून तिने OTTच्या प्लॅटफॉर्मवर एंट्री केली होती. हा शो तिच्या खऱ्या आयुष्यावर आधारित होता.  मलायका अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशीपला घेऊन अनेकदा चर्चेत येत असते. दोघे अनेकवेळा व्हॅकेशनवर एकत्र जात असतात. 
 

Web Title: Malaika arora wore transparent outfi people got angry users said like urfi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.