एक्स पती अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावेळी या ठिकाणी स्पॉट झाली मलायका अरोरा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 04:27 PM2023-12-25T16:27:40+5:302023-12-25T16:28:45+5:30

Arbaaz Khan : अरबाज खानने रविवारी त्याची गर्लफ्रेंड शूरा खानसोबत दुसरे लग्न केले.

Malaika Arora was spotted at this place during the second marriage of ex-husband Arbaaz Khan, the video went viral | एक्स पती अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावेळी या ठिकाणी स्पॉट झाली मलायका अरोरा, व्हिडीओ व्हायरल

एक्स पती अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावेळी या ठिकाणी स्पॉट झाली मलायका अरोरा, व्हिडीओ व्हायरल

अभिनेता अरबाज खान(Arbaaz Khan)ने त्याची गर्लफ्रेंड शूरा खान(Shura Khan)सोबत २४ डिसेंबर रोजी लग्न केले. अभिनेत्याचे हे दुसरे लग्न आहे, याआधी त्याने मलायका अरोरासोबत लग्न केले होते पण दोघांचा घटस्फोट झाला. अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाला त्याचा मुलगा अरहानही उपस्थित होता. एकीकडे अरबाज खानची गर्लफ्रेंड शूरासोबत लग्न करत असताना दुसरीकडे त्याची माजी पत्नी मलायका अरोरा ख्रिसमसच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा तिच्या कुटुंबियांसोबत मध्यरात्री दिसली.

यावेळी मलायका अरोराने मिडनाईट माससाठी फॉर्मल ब्लेझरसह पांढरा पोशाख परिधान केला होता. तिने तिचे केस लाल रिबनच्या मदतीने सुंदर पोनीटेलमध्ये बांधले होते. तिने हिल्स घालून तिचा लूक पूर्ण केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, मलायका तिच्या कारकडे जाण्यापूर्वी तिच्या आईसोबत काही फोटो क्लिक करताना दिसत आहे.

मलायका-अरबाजने लग्नाच्या १९ वर्षानंतर घेतला घटस्फोट 
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी १९९८ मध्ये लग्न केले पण मार्च २०१६ मध्ये दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली आणि १९ वर्षांच्या लग्नानंतर मे २०१७ मध्ये त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला. अरबाज आणि मलायका यांना अरहान हा मुलगा आहे. सध्या अभिनेत्री अर्जुन कपूरला डेट करत आहे.

मलायका-अरबाजच्या मुलाने वडिलांच्या दुसऱ्या लग्नात केली खूप धमाल
मलायका तिच्या माजी पतीच्या दुसऱ्या लग्नाला हजर राहिली नाही, तर तिचा मुलगा वडिलांच्या दुसऱ्या लग्नात खूप मजा करताना दिसला. अरहानने त्याच्या नवीन आईसोबत बरेच फोटो क्लिक केले आहेत.

Web Title: Malaika Arora was spotted at this place during the second marriage of ex-husband Arbaaz Khan, the video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.