मुसळधार पावसात योगा क्लाससाठी निघाली मलायका, नो- मेकअप लूक व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 03:58 PM2019-07-27T15:58:15+5:302019-07-27T16:02:26+5:30

कितीही बिझी असली किंवा कोणत्या गोष्टीमुळे घराबाहेर पडणे अशक्य असले तरी मलायका आपल्या वर्कआऊटकडे दुर्लक्ष करत नाही.

Malaika Arora Steps Out For Yoga Class In Rains See Pics | मुसळधार पावसात योगा क्लाससाठी निघाली मलायका, नो- मेकअप लूक व्हायरल

मुसळधार पावसात योगा क्लाससाठी निघाली मलायका, नो- मेकअप लूक व्हायरल

googlenewsNext

तासनतास शुटिंग आणि कामाचं दडपण तसंच दगदग यांत स्वतःला फिट ठेवणं हीसुद्धा काळाची गरज आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी मंडळी फिटनेसवर विशेष लक्ष देतात. तासनतास जिममध्ये घालवत किंवा घरच्या घरी व्यायाम अथवा योगासन करत ते स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. बॉलिवूडची मुन्नी अर्थात मलायका अरोरा ही फिटनेस फ्रिक असल्याचे जगजाहिर आहे. कितीही बिझी असली किंवा कोणत्या गोष्टीमुळे घराबाहेर पडणे अशक्य असले तरी मलायका आपल्या वर्कआऊटकडे दुर्लक्ष करत नाही. फिट राहण्यासाठी सध्या मलायका योगा करते. त्यासाठी एकही दिवस ती चुकवत नाही. 


तिने काही सवयी स्वतःला लावून घेतल्या आहे. त्याचे ती नित्यनियमाने आणि काटेकोरपणे पालन करते. मुबंईत इतका पाऊस पडत असून  सर्वसामान्यांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. मात्र मलायका तरीही योगा क्लाससाठी इतक्या मुसळधार पावसात घराबाहेर दिसली. हातात छत्री आणि चेह-यावर कोणत्याही प्रकारचा मेक अप तिने केला नव्हता. विनामेकअप लूक तिचा मीडियाच्या कॅम-यात कैद झाला असून तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  

सध्या मलायका अर्जुन कपूरसह सुरू असलेल्या अफेअरमुळे जास्त चर्चेत असते. लकरच दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगत असतात.दोघेही एकत्र क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत असतात. दोघेही एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी नुकतेच मालदीव्हजलाही गेले होते. मलायका अरोरा आणि अरबाज खानने १९९८ साली प्रेमविवाह केला होता. २००२ साली मलायकाने अरहानला जन्म दिला. २०१६ साली त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि ११ मे, २०१७ साली ते विभक्त झाले. 

Web Title: Malaika Arora Steps Out For Yoga Class In Rains See Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.