​मलाइका अरोराला मिळाले १० सेकंदाचे चॅलेंज...! जिंकली की हरली, तुम्हीच बघा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 13:19 IST2018-03-20T07:49:31+5:302018-03-20T13:19:31+5:30

‘मुन्नी बदनाम हुई’ यासारख्या सुपर-डुपरहिट डान्स नंबर्समध्ये आपला जलवा दाखवणारी अभिनेत्री मलाइका अरोरा ४४ वर्षांची झालीय. पण तिच्यावर वाढत्या वयाचा जराही परिणाम झालेला दिसत नाही. याचे कारण म्हणजे, स्वत:ला फिट ठेवण्यासाठी मलाइका जीवतोड मेहनत घेते.

Malaika Arora gets 10 second challenge ...! Did you win that, you see! | ​मलाइका अरोराला मिळाले १० सेकंदाचे चॅलेंज...! जिंकली की हरली, तुम्हीच बघा!!

​मलाइका अरोराला मिळाले १० सेकंदाचे चॅलेंज...! जिंकली की हरली, तुम्हीच बघा!!

ुन्नी बदनाम हुई’ यासारख्या सुपर-डुपरहिट डान्स नंबर्समध्ये आपला जलवा दाखवणारी अभिनेत्री मलाइका अरोरा ४४ वर्षांची झालीय. पण तिच्यावर वाढत्या वयाचा जराही परिणाम झालेला दिसत नाही. याचे कारण म्हणजे, स्वत:ला फिट ठेवण्यासाठी मलाइका जीवतोड मेहनत घेते. जिममध्ये तासन् तास घाम गाळते. म्हणूनच तर भल्या भल्यांना जे चॅलेंज पेलताना घाम फुटेल, ते चॅलेंज मलाइकाने अगदी चुटकीसरशी पूर्ण करू शकते. होय, मलाइकाने तिच्या सोशल अकाऊंटवर  एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या ताज्या व्हिडिओत, मलाइका जिम ट्रेनरने दिलेले एक चॅलेंज पूर्ण करताना दिसतेय. ‘  हे चॅलेंज मी १० सेकंदात पूर्ण करू शकणार नाही, असा माझा कोच म्हणाला होता. मी ते ८ सेकंदातचं पूर्ण केले,’ असे हा व्हिडिओ शेअर करताना मलाइकाने लिहिले आहे. आता हे १० सेकंदाचे चॅलेंज कुठले, यासाठी तुम्हाला या बातमीसोबत दिलेला व्हिडिओचं बघावा लागेल.



ALSO READ : मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसला मलाइकाचा बिंधास्त अंदाज, फोटो झाले व्हायरल!

२३ आॅक्टोबर १९७३ रोजी जन्मलेल्या मलाइकाने एमटीव्ही व्हीजे म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. पण तिला खरी ओळख दिली ती आयटम नंबर्सने. ‘छय्या छय्या’ या ‘दिल से’ चित्रपटातील आयटम साँगमुळे मलायकाला नवी ओळख मिळाली. यानंतर ‘अनारकली डिस्को चली’,‘मुन्नी बदनाम हुई’,‘फॅशन खत्म मुझ पर’ अशा अनेक आयटम नंबर्समध्ये मलाइका दिसली. चित्रपटांप्रमाणेच मलाइका छोट्या पडद्यावरही अ‍ॅक्टिव्ह आहे. परीक्षक म्हणून ती अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसली आहे.
गतवर्षी मलाइकाने पती अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला होता. सन १९९८ मध्ये मलाइका व अरबाज या दोघांचा विवाह झाला होता.  पण तब्बल १८ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर ११ मे २०१७ रोजी दोघांनी घटस्फोट घेऊन आपापल्या वेगळ्या वाटा निवडल्यात.  

Web Title: Malaika Arora gets 10 second challenge ...! Did you win that, you see!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.