दोन महिन्यांपूर्वी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं ब्रेकअप!, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 03:18 PM2024-01-05T15:18:34+5:302024-01-05T15:19:24+5:30

Malaika Arora-Arjun Kapoor : बी-टाऊनचे पॉवर कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र आता एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करणारी ही जोडी विभक्त झाल्याची बातमी समोर येत आहे.

Malaika Arora and Arjun Kapoor broke up two months ago!, know about it | दोन महिन्यांपूर्वी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं ब्रेकअप!, जाणून घ्या याबद्दल

दोन महिन्यांपूर्वी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं ब्रेकअप!, जाणून घ्या याबद्दल

बी-टाऊनचे प्रसिद्ध जोडपे अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एक्स पती अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर केवळ एक वर्षानंतर, मलायकाने अर्जुनसोबतच्या तिच्या रिलेशनशीप जगजाहीर केले होतेआणि तेव्हापासून दोघांमध्ये चांगले बॉण्डिंग दिसून आले होते.

वयात १२ वर्षांचे अंतर आणि ट्रोल होऊनही मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील प्रेम या पाच वर्षांत कधीच कमी झाले नाही. त्यांच्या ब्रेकअपच्या अफवा बर्‍याच वेळा पसरल्या होत्या, पण दोघांनीही ते फेटाळून लावले होते. मात्र, सध्या मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपची पुन्हा एकदा सिनेविश्वात चर्चा होत आहे, मात्र यावेळी या जोडप्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मलायका आणि अर्जुनचे ब्रेकअप का झाले?
ब्रेकअपच्या वृत्तादरम्यान, नुकतेच मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले की मलायका आणि अर्जुन दोन महिन्यांपूर्वीच वेगळे झाले होते, परंतु आता त्यांच्यात सर्वकाही चांगले होण्याच्या मार्गावर आहे. झूमच्या मते, दोन महिन्यांपूर्वी मलायका आणि अर्जुनमधील मतभेद इतके वाढले होते की दोघांनीही एकमेकांना स्पेस देण्याचा निर्णय घेतला होता. रिपोर्ट्सनुसार, वेगळे झाल्यानंतर मलायका आणि अर्जुनला समजले की ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर अचानक वेगळे होणे आणि सुंदर आठवणी विसरणे सोपे नाही आणि वेगळे होणे हा कशावरही उपाय नाही, असे सूत्राचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने आपल्या नात्याला पुन्हा संधी देण्याचे ठरवले असून तो त्यावर काम करत आहे.
लग्नावरुन दोघांमध्ये मतभेद झाल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. आतापर्यंत मलायका आणि अर्जुनने ब्रेकअपच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जर खरंच ते विभक्त होणार होते आणि आता ते दोघे पुन्हा एकत्र आले असतील तर त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

दुसऱ्या लग्नाबद्दल मलायका म्हणाली..
एक्स पती अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नानंतर मलायका अरोरा तिच्या लग्नाबद्दल बोलली. 'झलक दिखला जा १०'च्या मंचावर फराह खानने मलायकाला विचारले होते की ती २०२४ मध्ये पुन्हा लग्न करण्याचा विचार करत आहे की नाही? यावर अभिनेत्री म्हणाली होती की, कोणी असेल तर मी त्याच्याशी लग्न करेन. कुणी विचारलं तर लग्न करेन.
मलायका अरोराने २०१७ मध्ये अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला होता. २०१८ पासून ती तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत आहे.

Web Title: Malaika Arora and Arjun Kapoor broke up two months ago!, know about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.