मलायका अरोरा आणि अरबाज खान पु्न्हा दिसले एकत्र !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 17:29 IST2017-02-22T11:59:06+5:302017-02-22T17:29:06+5:30

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी त्यांचे 18 वर्षांचे नाते संपवण्यासाठी कोर्टाची पायरी चढली असले तरी अनेक वेळा दोघे ...

Malaika Arora and Arbaaz Khan look back together! | मलायका अरोरा आणि अरबाज खान पु्न्हा दिसले एकत्र !

मलायका अरोरा आणि अरबाज खान पु्न्हा दिसले एकत्र !

ायका अरोरा आणि अरबाज खान यांनी त्यांचे 18 वर्षांचे नाते संपवण्यासाठी कोर्टाची पायरी चढली असले तरी अनेक वेळा दोघे एकत्र दिसतात. फॅमिली गेटूगेदर असो किंवा मग पार्टीच्या ठिकाणी दोघे एकत्र दिसणे अगदी सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. नुकतेच दोघांना मलायकाच्या वडिलांच्या बर्थ पार्टीच्या ठिकाणी एकत्र पाहण्यात आले. मलायका, अमृतासोबत अरबाज ही या अनिल अरोरा यांच्या बर्थ डे पार्टीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला होता. अमृताने बर्थ डे चे फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मलायका आणि अरबाजर वेगवेगळे उभे असलेले दिसतायेत. 



काही महिन्यांपूर्वी अरबाज आणि मलायकाने आपला 18 वर्षांचा संसारला पूर्णविराम लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या दोघांनी बांद्रा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा रितसर अर्ज देखील दाखल केला. यावर दुसरी सुनावणी देखील झाली आहे. घटस्फोटानंतर पोटगी म्हणून मलायकाने अरबाजकडे १० कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे समजते आहे. मलायका आणि अरबाजचा संसार वाचवण्यासाठी खान कुटुंबीयांकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानने अनेक वेळा फॅमिली गेटूगेदरच्या निमित्ताने दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सगळ प्रयत्न व्यर्थ गेले. 

 मुन्नी बदनाम हुई या आयटम साँगने मलायका खरी ओळख मिळवून दिली.15 वर्षीय अरहानची आई असलेली मलायका आयटम साँग करुन खुश असल्याचे सांगते. तसेच मला चित्रपटातल्या लांब भूमिका करण्यात रस नसल्याचे ही तिने सांगितले. नुकतेच झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर दिव्या रेड्डीसाठी मलायका रॅमवर उतरली होती.    

Web Title: Malaika Arora and Arbaaz Khan look back together!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.