चित्रपट बनण्यापूर्वी कपिल देव यांनी 1983च्या वर्ल्ड कप संदर्भात केले खळबळजनक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:59 IST2017-09-28T12:29:28+5:302017-09-28T17:59:28+5:30

कर्णधार म्हणून कपिल देव यांनी भारताला 1983मध्ये क्रिकेटमध्ये पहिले वर्ल्ड कप जिंकून दिले होते. लवकरच 1983 साली भारतीय संघाने ...

Before making a film, a statement made by Kapil Dev about the 1983 World Cup | चित्रपट बनण्यापूर्वी कपिल देव यांनी 1983च्या वर्ल्ड कप संदर्भात केले खळबळजनक वक्तव्य

चित्रपट बनण्यापूर्वी कपिल देव यांनी 1983च्या वर्ल्ड कप संदर्भात केले खळबळजनक वक्तव्य

्णधार म्हणून कपिल देव यांनी भारताला 1983मध्ये क्रिकेटमध्ये पहिले वर्ल्ड कप जिंकून दिले होते. लवकरच 1983 साली भारतीय संघाने जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपचा संघर्षमय प्रवास रुपेरी पडद्यावर उतरवण्यात येणार आहे. नुकतेच झालेल्या एका कार्यक्रमात कपिल देव यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ते म्हणाले मी भारतीय संघाचा कर्णधार होतो आणि मला इंग्रजी भाषा बोलायला नाही यायची म्हणून माझ्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा जास्त करुन लोक इंग्रजी भाषेत संभाषण करायचे. ज्यावेळी मला कर्णधार बनवण्यात आले त्यावेळी अनेकांनी यावर मला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून आक्षेप नोंदवला होता. मी ही यावर सांगितले इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही कोणाला तरी ऑक्सफोर्डवरुन घेऊन या मी मात्र खेळणं सुरुच ठेवणार. 1983मधल्या वर्ल्ड कपच्या आठवणी सांगताना ते पुढे म्हणाले आमच्यात फक्त आत्मविश्वासाची कमी होती मॅचमध्ये मिळालेल्या विजयामुळे ती पूर्ण झाली.  माझी पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची होती तर माझे इतर खेळाडू मित्र सुसंस्कृत कुटुंबातून आले होते. 

कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. तर कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग साकारतो आहे. कबीर खानने सांगितले हा चित्रपट त्याच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला तर यात काही नवल नाही. याआधी कबीर खानने बजरंगी भाईजान सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कबीरचे सासरे नेहमी त्याच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला येतात मात्र यावेळी चित्रपटाच्या अधिकृत घोषणे दरम्यान ते पहिल्यांदाच उपस्थिती असल्याचे यावेळी कबीर खानने सांगितले. आपल्या रिअल हिरोंना भेटायले ते आले असल्याचे कबीरने सांगितले. 

रणवीर सिंगचा पद्मावती चित्रपट 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्यासह दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूरची देखील महत्त्वाची भूमिका आहे. यात दीपिका राणी पद्मावतीची भूमिका साकरते आहे. शाहिद पद्मावतीचा पती चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगचा भूमिकेत झळकणार आहे तर रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसले. 

ALSO RAED : ​Exclusive : 'या' क्रिकेटरमुळे रणवीर सिंग बनला अभिनेता !

Web Title: Before making a film, a statement made by Kapil Dev about the 1983 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.