'मर्द को दर्द नहीं होता', 'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीची लेक अभिमन्यूसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:52 PM2024-03-22T12:52:13+5:302024-03-22T12:55:09+5:30

नुकतेच भाग्यश्रीनं लाडक्या लेकासाठी खास पोस्ट केली आहे.

Maine Pyaar Kiya fame Bhagyashree's special post for son Abhimanyu Dasani | 'मर्द को दर्द नहीं होता', 'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीची लेक अभिमन्यूसाठी खास पोस्ट

'मर्द को दर्द नहीं होता', 'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीची लेक अभिमन्यूसाठी खास पोस्ट

सलमान खान व भाग्यश्रीचा ‘मैने प्यार किया’ आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. हा चित्रपट न पाहिलेला प्रेक्षकवर्ग क्वचितच असेल. सलमान-भाग्यश्रीची या चित्रपटामधील केमिस्ट्री तर प्रचंड गाजली. मात्र ही जोडी पुन्हा पडद्यावर दिसली नाही. यातील मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री या चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीपासून लांब होती. मात्र आता तिचा मुलगादेखील अभिनयनात सक्रीय आहे. नुकतेच भाग्यश्रीनं लाडक्या लेकासाठी खास पोस्ट केली आहे. 

भाग्यश्री चित्रपटसृष्टीपासून लांब असली मात्र आता तिचा मुलगा बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे. भाग्यश्रीला दोन मुले आहेत, मुलाचे नाव अभिमन्यू आणि मुलीचे नाव अवंतिका आहे. अवंतिकाने मिथ्या या वेबसीरिजमधून पदार्पण केलं आहे. तर अभिमन्यूने वसन बालन यांच्या ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन पाच वर्ष झाली आहेत. यानिमित्ताने भाग्यश्रीने मुलासाठी खास पोस्ट केली आहे. 

भाग्यश्रीनं सोशल मीडियावर लाडक्या लेकासाठी पोस्ट करत लिहलं, 'मर्द को दर्द नहीं होता! अभिमन्यूचं चित्रपटसृष्टीत पदार्पण आणि एक अभिनेता म्हणून आंतरराष्ट्रीय ओळख मिळवण्याच्या प्रवासाला  5 वर्षे पुर्ण झाली आहेत. वसन बाला यांचे अभिमन्यूवर विश्वास ठेवल्याबद्दल खूप आभार. अभिमन्यू तुझा मला खूप अभिमान आहे', असं भाग्यश्रीनं लिहलं.

भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे.  'दम मारो दम' आणि 'नौटंकी साला'मध्ये त्याने अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलंं होते. यानंतर मीनाक्षी सुंदरेश्वर, निकम्मा, मोनिका ओ माय डार्लिंग, किसी का भाई किसी की जान या सिनेमातही तो झळकला आहे. चाहते त्यांच्या नव्या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अभिमन्यू हा सोशल मीडियावरही सक्रीय असतो. यातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. 

Web Title: Maine Pyaar Kiya fame Bhagyashree's special post for son Abhimanyu Dasani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.