#StaySafeMaheshAnna (स्टे सेफ महेशअण्णा) हा हॅशटॅग ट्विटरवर का होतोय ट्रेंड, सगळीकडे रंगलीय याचीच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 15:20 IST2021-04-23T15:04:42+5:302021-04-23T15:20:11+5:30

#StaySafeMaheshAnna हा हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये असण्याचे एक विशेष कारण आहे.

Mahesh Babu Isolates Himself After Hair Stylist Gets COVID tay safe mahesh anna hashtag trend on social media | #StaySafeMaheshAnna (स्टे सेफ महेशअण्णा) हा हॅशटॅग ट्विटरवर का होतोय ट्रेंड, सगळीकडे रंगलीय याचीच चर्चा

#StaySafeMaheshAnna (स्टे सेफ महेशअण्णा) हा हॅशटॅग ट्विटरवर का होतोय ट्रेंड, सगळीकडे रंगलीय याचीच चर्चा

ठळक मुद्देदाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या स्टायलिस्टला कोरोनाची लागण झाली असून महेश बाबूने स्वतःला क्वारंटाईन केले आहे.

कालपासून ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर #StaySafeMaheshAnna स्टे सेफ महेशअण्णा हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. केवळ ट्विटरवरच नव्हे तर सगळ्याच सोशल मीडियावरील साईटवर या हॅशटॅगची चर्चा रंगली आहे. हा हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये असण्याचे एक विशेष कारण आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या स्टायलिस्टला कोरोनाची लागण झाली असून महेश बाबूने स्वतःला क्वारंटाईन केले आहे. तसेच तो सध्या चित्रीकरण करत असलेल्या सरकारू वारी पाटा या चित्रपटाच्या टीममधील अनेक सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

महेश बाबू आणि त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्या हैद्राबादमधील घरी क्वारंटाईन आहेत ही गोष्ट महेशच्या चाहत्यांना कळल्यानंतर महेश बाबूने स्वतःची काळजी घ्यावी असे सांगत त्याचे असंख्य चाहते सोशल मीडियावर ट्वीट करत आहेत. त्यामुळे ट्विटरवर स्टे सेफ महेशअण्णा हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे.

महेश बाबू टॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबूने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. महेश बाबू हा दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे. महेश बाबूने बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केले आहे. 

Web Title: Mahesh Babu Isolates Himself After Hair Stylist Gets COVID tay safe mahesh anna hashtag trend on social media