Mahesh Babu ने राजामौलींसमोर ठेवली मोठी अट, सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्रीचा पत्ता कट होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 04:44 PM2022-06-16T16:44:31+5:302022-06-16T16:44:45+5:30

Mahesh Babu : बोललं तर असंही जात आहे की, राजामौली आलिया भट्टला या सिनेमात मुख्य हिरोईन म्हणून घेणार आहे. आता अशी बातमी समोर येत आहे ज्यामुळे बॉलिवूड फॅन्स नाराज होऊ शकतात.

Mahesh Babu does not want to work with any bollywood actresses informs SS Rajamouli | Mahesh Babu ने राजामौलींसमोर ठेवली मोठी अट, सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्रीचा पत्ता कट होणार?

Mahesh Babu ने राजामौलींसमोर ठेवली मोठी अट, सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्रीचा पत्ता कट होणार?

googlenewsNext

Mahesh Babu News: एस.एस.राजामौली (S S Rajamouli) यांच्या आगामी सिनेमात टॉलिवूड प्रिन्स महेश बाबू (Mahesh Babu) मुख्य भूमिकेत असणार आहे. सोबतच या सिनेमात बॉलिवूडची हिरोईन असणार अशीही जोरदार चर्चा सुरू आहे. चर्चा आहे की, राजामौली यांच्या आगामी सिनेमात महेश बाबूसोबत आलिया भट्ट किंवा जान्हवी कपूर दिसू शकते. बोललं तर असंही जात आहे की, राजामौली आलिया भट्टला या सिनेमात मुख्य हिरोईन म्हणून घेणार आहे. आता अशी बातमी समोर येत आहे ज्यामुळे बॉलिवूड फॅन्स नाराज होऊ शकतात.

अशी चर्चा सुरू आहे की, सुपरस्टार महेश बाबूने दिग्दर्शक एसएस राजामौली यांना आपल्या सिनेमात कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला कास्ट करण्यास मनाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेश बाबूला आपल्या आगामी मेगा बजेट पॅन इंडिया सिनेमात बॉलिवूड नाही तर टॉलिवूड अभिनेत्रीसोबत काम करायचं आहे. ही आपली इच्छा त्याने राजामौली यांच्याकडे बोलून दाखवली आहे. जर राजामौली यांनी महेश बाबूचं ऐकलं तर या सिनेमात महेश बाबूसोबत एखादी साऊथमधीलच अभिनेत्री दिसेल.

दरम्यान महेश बाबू याआधी बॉलिवूडबाबतच्या आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. एका इव्हेंटमध्ये बॉलिवूडमध्ये कधी काम करणार या प्रश्नावर उत्तर देत तो म्हणाला होता की, त्याला बॉलिवूड अफॉर्ड करू शकत नाही. सोबतच तो असंही म्हणाला होता की, बॉलिवूड सिनेमात काम करून त्याला त्याचा वेळ वाया घालवायचा नाहीये. दरम्यान महेश बाबू स्टार दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी सिनेमात आलिया भट्टसोबतच जान्हवी कपूरचं नावही समोर आलं होतं. पण आता असं दिसतंय की, दोघीही या सिनेमात दिसणार नाही. अर्थात ते येत्या काही दिवसातच कळेलच.

Web Title: Mahesh Babu does not want to work with any bollywood actresses informs SS Rajamouli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.