सुपरस्टार विजयला कोर्टानं झाप झाप झापलं, ठोठावला लाख रूपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 02:11 PM2021-07-14T14:11:18+5:302021-07-14T14:15:29+5:30

Thalapathy Vijay fined : तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार विजयला मद्रास हायकोर्टानं तब्बल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

The Madras High Court imposed a fine of Rs 1 lakh on actor Thalapathy Vijay |  सुपरस्टार विजयला कोर्टानं झाप झाप झापलं, ठोठावला लाख रूपयांचा दंड

 सुपरस्टार विजयला कोर्टानं झाप झाप झापलं, ठोठावला लाख रूपयांचा दंड

googlenewsNext
ठळक मुद्देमद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश न्या. एसएम सुब्रमण्यम यांनी विजयला या टॅक्स चोरीप्रकरणी चांगलेच खडेबोल सुनावले.

साऊथचा सुपरस्टार विजय (Thalapathy Vijay) सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, मद्रास हायकोर्टानं विजय तब्बल एक लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. इतकंच नाही तर हा दंड ठोठावताना कोर्टानं विजयला चांगलंच झापलं आहे. हे संपूर्ण प्रकरण विजयच्या रॉल्स रॉयल कारशी संबंधित आहे.
तर विजयनं स्वत:साठी इंग्लंडहून Rolls Royce Ghost ही अलिशान कार मागवली होती. मीडिया रिपोर्टनुसार, 7.95 कोटींची ही कार तर मिळवली पण ती भारतात आल्यावर लागणारा एन्ट्री टॅक्स देण्यासाठी टाळाटाळ करू लागला. चक्क यासाठी हायकोर्टात एक याचिका दाखल करून त्यानं हा टॅक्स रद्द करावा अशी मागणी केली. आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा टॅक्स वसूल केला जाऊ नये, अशी विनंती त्यानं केली.

मद्रास हायकोर्टानं विजयची ही याचिका फेटाळून लावली. शिवाय त्याला 1 लाख रूपयांचा दंडही ठोठावला. दंडाची ही रक्कम तामिळनाडूच्या मुख्यमंत्री कोव्हिड 19 निधीत जामा करण्याचे आदेश दिलेत.

झाप झाप झापलं...

मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश न्या. एसएम सुब्रमण्यम यांनी विजयला या टॅक्स चोरीप्रकरणी चांगलेच खडेबोल सुनावले.‘ फिल्मी कलाकारांना फॅन्स खºया आयुष्यातले हिरो मानतात. पण आज हेच कलाकार  तमिलनाडु सारख्या राज्याचे शासक बनले आहेत. चित्रपटात काम करणाºया हिरोकडून टॅक्स चोरी करणे अपेक्षितच नाही.  हा अ‍ॅटीट्यूड अँन्टी नॅशनल आणि असंवैधानिक आहे.  एकीकडे सामान्य लोकांना टॅक्स देण्यासाठी सांगितलं जातं आणि दुसरीकडे काही बडे लोकं टॅक्सचोरी करतात. अभिनेत्यानं त्यांच्या लाखो चाहत्यांच्या भावना समजायला हव्यात, जे लोक तिकिटं खरेदी करुन त्यांचे सिनेमा पाहतात, त्यांनी यातून काय आदर्श घ्यावा?,’ अशा शब्दात कोर्टानं विजयला झापलं.
तुम्हाला माहित असेलच की, सुपरस्टार विजयनं कमाईच्या बाबतीत रजनीकांत यांनाही मागं सोडलं आहे. ‘थलापति 65’ या सिनेमासाठी विजयनं तब्बल 100 कोटी रूपये मानधन घेतलं आहे. रजनीकांत यांनी ‘दरबार’ साठी 90 कोटी घेतले होते.

Web Title: The Madras High Court imposed a fine of Rs 1 lakh on actor Thalapathy Vijay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :TollywoodTollywood