माधुरी दीक्षित आलिया भट्टच्या आईच्या भूमिकेत दिसणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 17:03 IST2016-06-21T11:33:32+5:302016-06-21T17:03:32+5:30
बॉलिवूडची धक धक क्वीन माधुरी दीक्षित आलिया भट्टच्या आईच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता असून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. माधुरी ...

माधुरी दीक्षित आलिया भट्टच्या आईच्या भूमिकेत दिसणार ?
ब लिवूडची धक धक क्वीन माधुरी दीक्षित आलिया भट्टच्या आईच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता असून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. माधुरी अगोदर आईच्या भूमिकेसाठी नकार देत असे. मात्र आता आलियाच्या आईचा रोल करणार का, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
अभिषेक वर्मनच्या ‘शिद्दत’ या चित्रपटात आलिया भट्ट, वरुण धवन आणि अर्जुन कपूर दिसणार आहेत. त्याचप्रमाणे माधुरीलाही या सिनेमासाठी विचारणा झाली आहे. या सिनेमाचं नाव आधी ‘कलंक’ होतं, नंतर ते बदलून ‘शिद्दत’ करण्यात आलं. त्यात आलियाच्या आईच्या भूमिकेत माधुरी दिसू शकते.