पहिल्यांदाच समोर आला धक-धक गर्ल माधुरी दीक्षितच्या आईचा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 18:54 IST2021-03-06T18:50:47+5:302021-03-06T18:54:35+5:30

माधुरीने तिच्या आई आणि पतीसोबतचा एक फोटो शेअर केला असून हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

madhuri dixit shares her mother picture on social media | पहिल्यांदाच समोर आला धक-धक गर्ल माधुरी दीक्षितच्या आईचा फोटो

पहिल्यांदाच समोर आला धक-धक गर्ल माधुरी दीक्षितच्या आईचा फोटो

ठळक मुद्देमाधुरीने हा फोटो पोस्ट करून केवळ एक दिवस झाले आहे. पण केवळ एका दिवसांत तीन लाखाहून अधिक लाईक्स या फोटोला मिळाले आहेत.

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या डान्सने आणि अदांनी सर्वांनाच मदहोश करते. माधुरी जेवढी तिच्या अभिनयासाठी लोकप्रिय आहे तेवढीच ती तिच्या डान्ससाठीही आहे. माधुरीला प्रचंड लोकप्रियता असून तिेचे फॅन्स जगभरात आहेत. माधुरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर संवाद साधत असते. तसेच तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकताच तिच्या आईसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

माधुरीने तिच्या आई आणि पतीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत अनमोल असे लिहिले आहे. माधुरीने हा फोटो पोस्ट करून केवळ एक दिवस झाले आहे. पण केवळ एका दिवसांत तीन लाखाहून अधिक लाईक्स या फोटोला मिळाले आहेत. तिच्या पतीचे नाव श्रीराम नेने असून ते अनेक वर्षं अमेरिकेत राहात होते. 

माधुरी दीक्षितच्या कामाबाबत सांगायचं तर ती कलंक आणि टोटल धमाल या सिनेमात दिसली होती. आता तिने एका डान्स रिएलिटी शोमध्ये जज म्हणून वापसी केली आहे. डान्स दिवानेच्या नव्या सीझनमध्ये ती सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता माधुरी लवकरच काही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

माधुरीने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. ऐंशी-नव्वदीच्या दशकात तिने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. दिल, हम आपके है कौन, दिल तो पागल है यांसारख्या अनेक चित्रपटांमधील तिच्या भूमिकांसाठी तिला पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 

Web Title: madhuri dixit shares her mother picture on social media