उदयपूरच्या ग्रँड वेडिंगमध्ये माधुरी दीक्षितचा 'डोला रे डोला' गाण्यावर अफलातून डान्स, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 10:47 IST2025-11-23T10:47:21+5:302025-11-23T10:47:57+5:30
उदयपूरमध्ये त्यांच्या लग्नाचा ३ दिवसाचा शाही सोहळा पार पडत आहे. या ग्रँड वेडिंगसाठी अनेक सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. नेत्रा आणि गदिराजू यांच्या मेहंदी सोहळ्याला माधुरी दीक्षितने 'डोला रे डोला' गाण्यावर ठेका घेत चार चांद लावले.

उदयपूरच्या ग्रँड वेडिंगमध्ये माधुरी दीक्षितचा 'डोला रे डोला' गाण्यावर अफलातून डान्स, व्हिडीओ व्हायरल
सध्या सगळीकडे देशातल्या एका ग्रँड वेडिंगची चर्चा रंगली आहे. बिजनेसमॅन रामा राजू मंटेना यांची मुलगी नेत्रा मंटेना हिचा विवाहसोहळा चर्चेचा विषय बनला आहे. नेत्रा मंटेना ही अंत्र्योप्रेनोर असलेल्या वामसी गदिराजू यांच्याशी लग्न करत आहे. उदयपूरमध्ये त्यांच्या लग्नाचा ३ दिवसाचा शाही सोहळा पार पडत आहे. या ग्रँड वेडिंगसाठी अनेक सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. नेत्रा आणि गदिराजू यांच्या मेहंदी सोहळ्याला माधुरी दीक्षितने डोला रे डोला गाण्यावर ठेका घेत चार चांद लावले.
नेत्रा आणि गदिराजू यांच्या मेहंदी सोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत माधुरी देवदास सिनेमातील गाजलेल्या डोला रे डोला गाण्यावर डान्स करत आहे. माधुरीने हिरव्या रंगाचा लेहेंगा आणि गुलाबी रंगाची ओढणी असा पेहराव केला आहे. डोला रे डोला गाण्यावर माधुरीने पुन्हा एका तिच्या अदा दाखवत चाहत्यांना थक्क केलं आहे. तिचा डान्स पाहून चाहत्यांना ऐश्वर्या रायची आठवण आली आहे. देवदासमध्ये डोला रे डोला गाण्यावर माधुरी आणि ऐश्वर्या राय या दोघींनी डान्स केला होता.
नेत्रा आणि वामसी गदिराजू यांच्या लग्नाच्या विधींना २१ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. २३ नोव्हेंबरला ते दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या कपलचा संगीत नाइट सोहळा करण जोहर आणि सौफी चौधरी यांनी होस्ट केला होता. तर रणवीर सिंग, वरुण धवन, जान्हवी कपूर, क्रिती सेनन आणि शाहिद कपूर यांनी सोहळ्याला हजेरी लावत त्यांच्या डान्स परफॉर्मन्सने चाहत्यांची मनं जिंकली.