सेटवर ढसाढसा रडली होती माधुरी दीक्षित, दिग्गज अभिनेत्याने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 03:26 PM2024-04-10T15:26:38+5:302024-04-10T15:27:36+5:30

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचा 'प्रेम प्रतिज्ञा' सिनेमा १९८९ साली रिलीज झाला होता. 'प्रेम प्रतिज्ञा' मधील माधुरी दीक्षितचा अभिनय प्रेक्षकांना खूप भावला होता. पण तुम्हाला माहीत आहे का की 'प्रेम प्रतिज्ञा'च्या एका सीनच्या शूटिंगपूर्वी माधुरी दीक्षित ढसाढसा रडू लागली आणि तिने सीन शूट करण्यासही नकार दिला होता.

Madhuri Dixit cried profusely on the sets, the legendary actor told the story | सेटवर ढसाढसा रडली होती माधुरी दीक्षित, दिग्गज अभिनेत्याने सांगितला किस्सा

सेटवर ढसाढसा रडली होती माधुरी दीक्षित, दिग्गज अभिनेत्याने सांगितला किस्सा

'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakravarti) यांचा रोमँटिक ड्रामा सिनेमा 'प्रेम प्रतिज्ञा' १९८९ साली रिलीज झाला होता. 'प्रेम प्रतिज्ञा' मधील माधुरी दीक्षितचा अभिनय प्रेक्षकांना खूप भावला होता. पण तुम्हाला माहीत आहे का की 'प्रेम प्रतिज्ञा'च्या एका सीनच्या शूटिंगपूर्वी माधुरी दीक्षित ढसाढसा रडू लागली आणि तिने सीन शूट करण्यासही नकार दिला. होय... ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी एका मुलाखतीदरम्यान 'प्रेम प्रतिज्ञा' चित्रपटाच्या सेटवरील किस्सा शेअर केला आहे.

ज्येष्ठ अभिनेते रणजीत मुव्हीज यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. जिथे रणजीत प्रेम प्रतिज्ञा आणि माधुरी दीक्षित फिल्म्सबद्दल बोलले आहेत. रणजीत म्हणाले की 'ती (माधुरी) रडू लागली आणि सीन करायलाही नकार दिला. त्याला परिस्थिती माहित नव्हती... मग एका कला दिग्दर्शकाने त्यांना सांगितले. ते बंगाली कलादिग्दर्शक होते. आमचे दिग्दर्शक बापू होते, ते दक्षिणेचे होते. मी सेटवर मजा करायचो आणि माझ्या सहकलाकारांना म्हणायचो की डार्लिंग, तिकडे थोडासा चेहरा फिरवा, मी कपडे बदलून घेईन. मेकअप रुममध्ये जाण्याचीही मला सवय नव्हती. हे अगदी सामान्य होते आणि मला तसे स्वीकारले गेले.

माधुरीचं रडणं सुरुच होतं....
रणजीत यांनी त्यावेळी आपण विनयभंगासारखे सीन करण्यासाठी कधीही जबरदस्ती केली नसल्याचे सांगितले आणि ते फार प्रोफेशनल असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, "माधुरीचं रडणं सुरुच होतं. मला दुसऱ्या शूटला जायचं होतं. मी तिला फोन करण्यास सांगितला. मला कोणीही ती सीन शूट करण्यास तयार नसल्याचे सांगत नव्हते. अखेर ती तयार झाली. वीरु देवगन तेव्हा फाईट मास्टर होते. त्यांनी कॅमेरा सतत रोल होईल असे स्पष्ट केले होते. कॅमेरा मध्येमध्ये बंद होता कामा नये असे त्यांनी सांगितले होते. विनयभंग हा कामाचा भाग आहे.  खलनायक वाईट व्यक्ती नाही. मी कधीही जबरदस्ती केली नाही, म्हणून माझ्या सर्व अभिनेत्रींना मी आवडायचो.
'प्रेम प्रतिज्ञा' चित्रपट १९८९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात माधुरी दीक्षितसह मिथुन चक्रवर्ती, सतीश कौशिक, विनोद मेहरा प्रमुख भूमिकेत होते.

Web Title: Madhuri Dixit cried profusely on the sets, the legendary actor told the story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.