Birthday Special : माधुरी दीक्षितचे स्थळ मराठीतील 'या' प्रसिद्ध गायकाने नाकारले होते, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 11:25 AM2021-05-15T11:25:49+5:302021-05-15T11:33:24+5:30

डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्नगाठ बांधण्याआधी माधुरीच्या माता-पित्यांनी तिच्यासाठी प्रसिद्ध गायकचे स्थळ पाहिले होते.

Madhuri dixit birthday special suresh wadekar rejected the proposal of marrying the actress | Birthday Special : माधुरी दीक्षितचे स्थळ मराठीतील 'या' प्रसिद्ध गायकाने नाकारले होते, कारण वाचून व्हाल हैराण

Birthday Special : माधुरी दीक्षितचे स्थळ मराठीतील 'या' प्रसिद्ध गायकाने नाकारले होते, कारण वाचून व्हाल हैराण

googlenewsNext

माधुरी दीक्षित (Madhuri dixit)ने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. झुमके ठुमके, लटके झटके याची झाली जादू. धकधक गर्ल म्हणून अशी तिची ओळख झाली. माधुरी आज आपला 54 वा वाढदिवस (Madhuri Dixit birthday ) साजरा करित आहेत. माधुरीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्याविषयी काही माहिती नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. 

डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्नगाठ बांधण्याआधी माधुरीच्या माता-पित्यांनी तिच्यासाठी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचे स्थळ पाहिले होते. अर्थात सुरेश वाडकरांनी नकार दिला आणि हे लग्न होता होता राहिले. त्यांनी होकार दिला असता तर कदाचित माधुरीने त्यांच्यासोबत लग्नगाठ बांधली असती.

सिनेमांत काम करण्यापेक्षा माधुरीने लग्न करून संसार करावा अशी तिच्या आई-वडिलाची इच्छा होती. म्हणून माधुरीसाठी वर संशोधनाचे काम त्यांनी सुरु केले होते. एकीकडे माधुरीला सिनेमांमध्ये काम करण्याची स्वप्न पडत होती तर दुसरीकडे तिचे आई- बाबा मात्र तिच्यासाठी मुलं शोधत होते. याचदरम्यान, माधुरीच्या वडिलांनी दिग्गज गायक सुरेश वाडकर यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला.

बॉलिवूडमध्ये सुरेश वाडकर हे तेव्हा नवोदित गायक म्हणून नावारुपास येत होते. माधुरीच्या आई- वडिलांना सुरेश यांना मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव पाठवला. पण सुरेश वाडकर यांनी या स्थळाला थेट नकार दिला. कारण काय तर माधुरी फार सडपातळ असल्याचे कारण त्यांनी दिले होते. या नकाराने माधुरीच्या आई- वडिलांना प्रचंड दु:ख झाले होते. एक चांगले स्थळ हातचे गेले, असेच इतर आईवडिलांप्रमाणे त्यांना वाटत होते. पण या नकाराने माधुरीचा मात्र फायदा झाला. कारण यानंतर तिच्या आई- वडिलांनी तिला सिनेमात काम करण्याची परवानगी दिली.

Web Title: Madhuri dixit birthday special suresh wadekar rejected the proposal of marrying the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.