‘या’ खानने केली भविष्यवाणी; दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे कधीच होणार नाही लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 21:39 IST2017-08-27T16:09:37+5:302017-08-27T21:39:53+5:30
सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे एकमेव असे जोडपे आहे, ज्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. ...
.jpg)
‘या’ खानने केली भविष्यवाणी; दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे कधीच होणार नाही लग्न!
स ्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे एकमेव असे जोडपे आहे, ज्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. या दोघांविषयी कुठलीही बातमी समोर आल्यास लोक ते आवडीने जाणून घेतात. नुकतेच हे दोघे अंबानी परिवारातर्फे आयोजित केलेल्या गणेश चतुर्थी कार्यक्रमात जोडीने उपस्थित होते. या कार्यक्रमातील दोघांचे फोटो सोशल मीडियावर त्यावेळी मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले. शिवाय दोघांच्या लग्नाच्याही चर्चा रंगू लागल्या. दोघेही एकमेकांना गेल्या कित्येक वर्षांपासून डेट करीत असल्याने हे दोघे विवाहाच्या बंधनात केव्हा अडकणार? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. परंतु बॉलिवूडच्या एका खानने त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केली असून, या दोघांचे कधीच लग्न होणार नसल्याचे म्हटले आहे.
खरं तर या खानची भविष्यावाणी दीपिका आणि रणवीरच्या चाहत्यांना कितपत गंभीरतेने घ्यावी, असाही प्रश्न आहे. कारण हा खान दुसरा-तिसरा कोणीही नसून, स्वत:ला बॉलिवूडचा सर्वांत मोठा क्रिटिक म्हणविणारा केआरके अर्थात कमाल आर. खान आहे. केआरकेने रणवीर आणि दीपिकाची भविष्यवाणी करणारी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी म्हटले होते की, सुशांत आणि अंकिताचे लग्न कधीच होणार नाही, ते खरं ठरलं. आज मी हेदेखील सांगतो की, रणवीर सिंग आणि दीपिकाचे लग्न कधीच होणार नाही.’
यानंतर केआरकेने आणखी एक ट्विट केले ज्यामध्ये लिहिले की, ‘हे दोघे लग्न यामुळे करणार नाहीत; कारण हे दोघे लव्हर्स नाहीत. हे दोघे केवळ चांगले मित्र आहेत.’ आता केआरकेची ही भविष्यवाणी कितपत सत्य ठरेल हे सांगणे मुश्किल आहे. परंतु केआरकेला असे का वाटत असावे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. असो, दीपिका आणि रणवीरच्या फॅन्सविषयी बोलायचे झाल्यास या दोघांना फॅन्सकडून ‘दीपवीर’ या नावाने संबोधले जाते. अशात या दोघांनी आयुष्यभरासाठी एकत्र यावे अशी चाहत्यांची इच्छा असेल यात दुमत नाही.

}}}} ">I said dat Sushant singh will never marry with Ankita n it's true today. I say 2day that Ranveer Singh won't marry with Deepika at any cost.
I said dat Sushant singh will never marry with Ankita n it's true today. I say 2day that Ranveer Singh won't marry with Deepika at any cost.— KRK (@kamaalrkhan) August 26, 2017
I said dat Sushant singh will never marry with Ankita n it's true today. I say 2day that Ranveer Singh won't marry with Deepika at any cost.— KRK (@kamaalrkhan) August 26, 2017}}}} ">— KRK (@kamaalrkhan)
August 26, 2017