मैं पल दो पल का शायर हूँ हे गीत लिहिणारे साहिर लुधियानी यांची प्रसिद्ध गीते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 11:41 IST2017-03-08T06:11:50+5:302017-03-08T11:41:50+5:30

साहिर लुधियानी यांनी लिहिलेली ए मेरी जोहराजबी, मैं पल दो पल का शायर हूँ, मांग के साथ तुम्हारा, कभी कभी यांसारखी एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. त्यांचा जन्म 8 मार्चला लुधियानामध्ये झाला.

The lyrics of Sahir Lodhiani, who wrote the lyrics, are a poem for me | मैं पल दो पल का शायर हूँ हे गीत लिहिणारे साहिर लुधियानी यांची प्रसिद्ध गीते

मैं पल दो पल का शायर हूँ हे गीत लिहिणारे साहिर लुधियानी यांची प्रसिद्ध गीते

हिर लुधियानी यांनी एकापेक्षा एक सरस गाणी हिंदी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. त्यांचा जन्म 8 मार्च 1921ला पंजाबमधील लुधियानामध्ये झाला होता. त्यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घेऊया त्यांची काही हिट गाणी...

साहिर लुधियानी यांना जाऊन अनेक वर्षं झाली असली तरी त्यांची अनेक गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहे. साहिर यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी लिहिली. साहिर यांचे शिक्षण लुधियानामधीलच खालसा हायस्कूलमध्ये झाले. त्यांनंतर सतिश चंदर धवन या मुलांच्या सरकारी महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. आज तेथील एका ऑडिटेरियमला साहिर यांचे नाव देण्यात आले आहे. कॉलेजमध्ये असतानाच साहीर त्यांच्या गझलसाठी खूप प्रसिद्ध होते. 
1943 मध्ये ते पंजाबमधून लाहोरला स्थायिक झाले. पण काहीच वर्षांत ते पुन्हा भारतात आले आणि दिल्लीत राहायला आले. भारतात परत आल्यानंतर काहीच महिन्यात ते कायमचे मुंबईत स्थायिक झाले. त्यावेळी गुलजार, तसेच प्रसिद्ध गीतकार किशन चंदर हे त्यांचे शेजारी होते. साहिर अनेक वर्षं गुलजार यांच्याच इमारतीत राहात असत. त्यानंतर सत्तरीच्या दशकात साहिर यांनी परछाईयाँ नावाचा बंगला बांधला आणि त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते तिथेच राहात होते. 
साहिर आणि लेखिका, गीतकार अमृता प्रितम यांची प्रेमकथा तर खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी लग्न केले नसले तरी अनेक वर्षं ते नात्यात होते. त्यानंतर गायिका सुधा मल्होत्रा साहिर यांच्या आयुष्यात आल्या.

साहिर यांनी आझादी की राह पर या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण या चित्रपटातील गाणी तितकीशी गाजली नाहीत. त्यानंतर त्यांनी नौजवान या चित्रपटाची गाणी लिहिली. 1951 साली प्रदर्शित झालेल्या बाजी या चित्रपटातील त्यांनी लिहिलेली सगळीच गाणी गाजली. प्यासा या चित्रपटातील गाणीदेखील त्यांचीच आहेत. त्यांची गाजलेली ही काही गाणीः

बाझी या चित्रपटातील तदबीर से बिगडी हुई तकदीर बना दे या गाण्याने साहिर यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.




प्यासा या चित्रपटातील ये दुनिया अगर मिल भी जाएँ तो क्या है हे दर्दभरे गीत साहिर यांनी लिहिले होते. 



नया दौर या चित्रपटातील मांग के साथ तुम्हारा हे त्यांनी लिहिलेले गाणे चांगलेच गाजले होते. 




कभी कभी या चित्रपटातील मैं पल दो पल का शायर हूँ, कभी कभी मेरे दिल में ही गाणी आजही रसिकांच्या ओठी रुळलेली आहेत.






वक्त चित्रपटातील ए मेरी जोहराजबी हे गाणे एव्हग्रीन गाणे मानले जाते. 



आ गले लग जा या चित्रपटातील वादा करो नही छोडोगी तुम मेरा साथ हे गाणे रसिकांना प्रचंड आवडते. 



मैं जिंदगी का साथ निभाता चला गया या गाण्यातून जीवन जगण्याचा मंत्रच त्यांनी लोकांना दिला होता. 




प्यासा या चित्रपटातील सर जो तेरा चकराये हे गाणे आजही तितकेच ताजे आहे. 



धूल का फूल या चित्रपटातील तू हिंदू बनेगा ना मुस्लमान बनेगा या गाण्यातून त्यांनी एक खूपच चांगला विचार त्यांच्या लेखणीतून मांडला होता. 




Web Title: The lyrics of Sahir Lodhiani, who wrote the lyrics, are a poem for me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.