या लव्हबर्डसने एकत्र पाहिला 'सुलतान'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 18:01 IST2016-07-05T12:31:10+5:302016-07-05T18:01:10+5:30
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. गेल्या काही दिवसांपासून या कपलमध्ये ...

या लव्हबर्डसने एकत्र पाहिला 'सुलतान'
style="margin: 0px; padding: 0px; border: 0px; outline: 0px; vertical-align: top; color: rgb(0, 0, 0); font-family: itf_devanagarimediumfont; font-size: 15px; line-height: 26px; background-image: initial; background-attachment: initial; background-size: initial; background-origin: initial; background-clip: initial; background-position: initial; background-repeat: initial;">अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. गेल्या काही दिवसांपासून या कपलमध्ये असलेला दुरावा आता संपुष्टात आला असून त्यांचे पॅचअप झाले आहे. काल रात्री त्यांना मुंबईत एकत्र पाहण्यात आले. निमित्त होत 'सुलतान' सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंग मुंबईतील यशराज फिल्म स्टुडिओमध्ये आयोजन करण्यात आले होतं. या चित्रपटात अनुष्का मुख्य अभिनेत्रिच्या भुमिकेत आहे. ६ जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असेल. 'सुलतान' सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिगंला दोघानी एकत्रचं हजेरी लावली होती. दोघेही एकाच कारमध्ये आले होते.काही दिवसांपूर्वी अनुष्का-विराटने एकमेकांना सोशल मीडिया अकाऊंट्सवर अनफॉलो केल्याने त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू होती. तसेच विराटचा लग्नाचा प्रस्तावही अनुष्काने फेटाळल्याचे वृत्त होते. विराट आणि अनुष्काने मात्र या मुद्यावर कोणतेही स्पष्टीकरण न देता मौन राखणे पसंत केले. मात्र त्यानंतर ते कुठेही एकत्र न दिसल्याने ब्रेकअचेच वृत्त खरे असल्याची चर्चा जोर धरू लागली होती.मात्र टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यात विराटच्या उत्तम खेळींनतर अनुष्काने विराटला मेसेज करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या व अभिनंदनही केले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनीच सोशल मिडियावर अनुष्काच्या नावाने सुरु असलेल्या जोक्सवरुन विराटने संताप व्यक्त करत अनुष्काला लक्ष्य करणा-यांनो थोडी शरम बाळगा, असे म्हटले होते. अखेर आता विराट-अनुष्का पुन्हा एकत्र आले असून, त्यांची जोडी अशीच सलामत रहावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.