यंदाचा व्हॅलेंटाईन असणार खास, करण जोहरच्या Love Storiyaanचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 01:38 PM2024-02-08T13:38:36+5:302024-02-08T13:42:38+5:30

करण जोहर हा त्याच्या रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखला जातो.

Love Storiyaan Trailer OUT: Karan Johar-backed web series Love Storiyaan to release on Valentine's Day | यंदाचा व्हॅलेंटाईन असणार खास, करण जोहरच्या Love Storiyaanचा ट्रेलर प्रदर्शित

यंदाचा व्हॅलेंटाईन असणार खास, करण जोहरच्या Love Storiyaanचा ट्रेलर प्रदर्शित

दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) 'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये चाहत्यांना एक खास गिफ्ट देणार आहे. करण जोहरने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन 'लव्ह स्टोरीयां'ची घोषणा केली. आज करणच्या Love Storiyaan सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

करण जोहर हा त्याच्या रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा करण तुम्हाला प्रेमाच्या सुंदर अनुभूतीची ओळख करून देणार आहे. या रोमांचक आणि अनोख्या ट्रेलरमध्ये करण जोहर Love Storiyaanमधील प्रेम आणि त्याच्या अनेक छटांबद्दल बोलताना दिसतोय. ट्रेलरमधील काही सुंदर दृश्ये प्रेमाची नवी व्याख्या मांडताना दिसून येत आहेत.

व्हॅलेंटाईन या खास मुहूर्तावर अर्थात 14 फेब्रुवारीला  प्राइम व्हिडीओवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये 6 उत्कृष्ट प्रेमकथा दाखवल्या आहेत. ज्या सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या आहे. अर्चना फडके, अक्षय इंडीकर, कॉलिन डी कुन्हा, हार्दिक मेहता, शाझिया इक्बाल आणि विवेक सोनी या सहा दिग्दर्शकांच्या माध्यमातून या कथा टिपल्या आहेत. ही सीरिज खऱ्या आयुष्यातील प्रेम कथांवर आधारित आहे. करणच्या या नव्या वेब सीरिजसाठी चाहतेही उत्सुक आहेत.

Web Title: Love Storiyaan Trailer OUT: Karan Johar-backed web series Love Storiyaan to release on Valentine's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.